भारतात 24 कोटी मुस्लीम अभिमानाने राहतात…,सौदी अरेबियात ओवैसींकडून पाकिस्तानची पोलखोल

एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सौदी अरेबियातून पाकिस्तानवर हल्ला चढवला. पाकिस्तानचा खोटो प्रचार उघड केला. ते म्हणाले, भारतात 24 कोटी मुस्लीम अभिमानाने आणि शांततेत राहत आहे. पाकिस्तान खोटा प्रोपागंडा करत आहे.

भारतात 24 कोटी मुस्लीम अभिमानाने राहतात...,सौदी अरेबियात ओवैसींकडून पाकिस्तानची पोलखोल
asaduddin owaisi
| Updated on: May 30, 2025 | 6:53 AM

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांमध्ये पोहचले आहे. भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वात ग्रुप 1 चे सर्वपक्षीय शिष्टमंडळ सौदी अरेबियात पोहचले. या शिष्टमंडळात एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश आहे. ओवैसी यांनी सौदी अरेबियातून पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारे राष्ट्र आहे. भारतात 24 कोटी मुस्लीम अभिमानाने राहत असल्याचे ओवैसी यांनी म्हटले.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी रियादमध्ये बोलताना सांगितले की, पाकिस्तान अरब वर्ल्ड आणि मुस्लीम देशांना संदेश देतो की, तो एक मुस्लीम राष्ट्र आहे. भारत मुस्लीम राष्ट्र नाही. भारतात 24 कोटी मुस्लीम अभिमानाने आणि शांततेत राहत आहे. पाकिस्तान खोटा प्रोपागंडा करत आहे. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या तर दक्षिण आशियामध्ये शांतता येईल. प्रगती आणि विकासाची दारे उघडतील. पाकिस्तान सार्कमध्ये अडचणी निर्माण करत आहे.

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत ओवैसी म्हणाले, भारताने पाकिस्तानचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची काही एअरबेसवर हल्ला केला. भारताने ठरवले असते तर पाकिस्तानच्या इतर एअरबेसचे मोठे नुकसान केले आहे. परंतु भारताला पाकिस्तानला फक्त आरसा दाखवयाचा होता.

असदुद्दीन ओवैसीने म्हटले, पाकिस्तानला एफएटीएफच्या (Financial Action Task Force) ग्रे लिस्टमध्ये पुन्हा टाकले पाहिजे. जेव्हा आसिम मुनीर याला पाकिस्तानमध्ये फील्ड मार्शल बनवले तेव्हा मोहम्मद एहसान नावाचा एक दहशतवादी फील्ड मार्शलच्या शेजारी बसला होता. त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवादी यांचे संबंध उघडपणे समोर येत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारतात पाठवतो. भारतात अशांतता निर्माण केली जाते. भारतात हिंदू-मुस्लीम दंगली करण्याचा प्रयत्न केला जातो.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पठाणकोट हल्ल्याचा उल्लेख केला. पठाणकोट हल्ला झाल्यानंतरही आमचे पंतप्रधान न बोलवताही पाकिस्तानात गेले होते. त्यावेळी मीसुद्धा आमच्या पंतप्रधानांवर टीका केली होती. अनेक विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केली होती. पाकिस्तान आमच्या देशात हल्ले घडवून आणत असताना आम्ही त्यांच्याशी चर्चा का करावी? असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला.