तिसऱ्या सर्वात मोठ्या तेल पुरवठादाराकडून आनंदाची बातमी, कच्च्या तेलाची चिंताच संपली, दहा वर्षांपासून बंद असलेली ही सेवा सुरु

मध्य पूर्वेतील युद्धामुळे होमुर्झचा मार्ग अडचणीत आल्याने भारताला तेलाची समस्या भेडसावत होती. आता गेल्या दहा वर्षांपासून बंद पडलेली ९६० किमीची 'किरकुक-सेहान' तेल पाइपलाइन पुन्हा सुरु होणार आहे.

तिसऱ्या सर्वात मोठ्या तेल पुरवठादाराकडून आनंदाची बातमी, कच्च्या तेलाची चिंताच संपली, दहा वर्षांपासून बंद असलेली ही सेवा सुरु
iran war update
| Updated on: Nov 18, 2026 | 7:36 PM

पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धा दरम्यान भारतासाठी खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आली आहे. भारताचा तिसरा सर्वात मोठा क्रुड तेल पुरवठादार असलेल्या इराकने आपल्या एक दशकाहून बंद पडलेली तेल पाईपलाईन पुन्हा सुरु केली आहे. ‘किरकुक-सेहान’ नावाची ही तेल पाइपलाइन पुन्हा सुरु झाल्याने होर्मुझमधील समुद्रा मार्गाच्या व्यत्ययाचा कोणताही परिणाम तेल पुरवण्यावर पडणार नाही. येथून कच्चे तेल थेट तुर्कीच्या बंदरापर्यंत पोहचवता येणार आहे. ही तेल पाईपलाईन तर एक ट्रेलर असून हळूहळू तेल पुरवठ्याचे अनेक नवीन रस्ते उघड होणार आहेत.

इराकने सुरु केली दहा वर्षांहून जुनी पाईपलाईन

Loading...

इराकचे तेल मंत्री बासेम खुदैर यांनी १७ नोव्हेंबर रोजी या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. किरकुक शहरापासून तुर्कीच्या भूमध्य सागरातील बंदर सेहानपर्यंत जाणारी ९६० किलोमीटर लांबीची पाईपलाईनमध्ये कच्च्या तेलाचे पम्पिंग पुन्हा सुरु झाली आहे. सुरुवातीला इराक या मार्गाने १ लाख २० हजार बॅरेल कच्चे तेल पाठवणार आहे.

तेल मंत्री पुढे म्हणाले की ही पाईपलाईन गेल्या १० वर्षांहून अधिक काळ बंद पडलेली होती. सध्या हीची दुरुस्ती, तांत्रिक तपासणी आणि ट्रायलचे काम सुरु आहे. जसे हे सर्व ट्रायल संपतील या पाईपलाईनद्वारे रोज ५ लाख बॅरलपर्यंत तेलाचा पुरवठा सुरु केला जाऊ शकेल. या संपूर्ण पाईपलाईनची एकूण क्षमता १५ लाख बॅरल प्रतिदिनहून जास्त आहे.त्यामुळे ही जगातील सर्वात मोठ्या तेल मार्गांपैकी एक आहे.

इराकचे हे पाऊल भारतासाठी किती आनंदाचे ?

भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्क्यांहून अधिक कच्चे तेल परदेशातून खरेदी करतो. रशिया आणि युएईनंतर इराक भारताचा तिसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार आहे. अशात इराकच्या या पाईपलाईनच्या सुरु होण्याने भारताची अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशासाठी ही बातमी मोठी आहे.

होर्मुझच्या नाकाबंदीने इराकलाही नुकसान

इराकने हे पाऊल केवळ जगाला दिलासा देण्याची उचलले नाही. तर स्वत:ला दिवाळखोर होण्यापासून वाचण्यासाठी उचलले आहे. इराकची संपूर्ण अर्थव्यवस्था तेलाच्या विक्रीवर अवलंबून आहे. आणि देशाच्या एकूण बजेटच्या सुमारे ९० टक्के भाग तेल विक्रीद्वारे येतो. युद्ध सुरु होण्याच्या आधी इराक आपले जवळपास सगळे तेल होर्मुझच्या समुद्री मार्गाने जगाला विकत होता.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us