ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरना छेडणाऱ्या अकीलचा हैराण करणारा क्राईम रेकॉर्ड, नंबर एकचा…

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट खेळाडूची छेड काढणारा आरोपी अकील याचे कारनामे समोर आले आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, अकील याआधी अनेकदा तुरुंगात गेला आहे आणि अलीकडेच जामिनावर बाहेर आला होता.

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरना छेडणाऱ्या अकीलचा हैराण करणारा क्राईम रेकॉर्ड, नंबर एकचा...
Indore Australia female cricketers molestation
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 26, 2025 | 7:21 PM

मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 दरम्यान ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूची छेड काढली होती. छेडछाड करणारा आरोपी अकील उर्फ नाईट्राचा गुन्हेगारी विश्वातील इतिहास आता समोर आला आहे. पोलिस तपासातून असे समजले आहे की हा आरोपी कोणता सामान्य नाही, तर इंदैरचा लिस्टेड गुन्हेगार आहे.

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघातील दोन स्टार महिला खेळाडू शहरातील एका हॉटेलमधून बाहेर पडल्या होत्या. तेव्हा अकीलने त्यांची छेड काढली. तसेच त्यांच्याशी अश्लील कृत्य आणि गैरवर्तन केलं. या घटनेने केवळ खेळाडूंनाच हादरवून सोडलं नाही, तर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

वाचा: आमदाराच्या खास माणसाचे घाणेरडे चाळे, महिलेसोबत अश्लील डान्स, कॅमेऱ्यात कैद झालेला प्रकार व्हायरल!

आरोपीवर यापूर्वीच अनेक गंभीर गुन्हे दाखल

तपासातून असे समोर आले आहे की अकील उर्फ नाईट्रावर यापूर्वी लूटमार, दरोडा, चोरी, खुनाचा प्रयत्न, अड्डेबाजी, ड्रग्स तस्करी आणि अवैध दारूचा व्यापार यासारखे दहापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो शहरातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये वॉन्टेड गुन्हेगार होता. पोलिस रेकॉर्डनुसार, अकील अनेकदा तुरुंगात गेला आहे आणि अलीकडेच जामिनावर बाहेर आला होता. तरीही, शहरातील त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं गेलं नाही. हाच निष्काळजीपणा आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सुरक्षेवर भारी पडू शकला असता.

ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंसोबत घडलेली ही घटना इंदूर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. ज्या आरोपीला सामान्य छेडछाडीच्या प्रकरणात पकडलं गेलं होतं, तो खरंतर मोठा गुन्हेगार निघाला. जर पोलिसांनी वेळीच त्याच्यावर पाळत ठेवली असती, तर कदाचित ही लज्जास्पद घटना टळली असती. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या या घटनेनंतर आता पोलिसांनी आरोपीच्या जुन्या प्रकरणांची पुन्हा तपासणी सुरू केली आहे, तर प्रशासन परदेशी खेळाडूंच्या सुरक्षा व्यवस्थेला आणखी कठोर करण्याच्या तयारीत आहे.