AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Israel Iran Conflict : वेळेला चिनी सिस्टिमकडून मोठा धोका म्हणून आज इराणची झाली अशी अवस्था

US Israel Iran Conflict : चीन जगात विश्वासघातकी म्हणून ओळखला जातो. चिनी कधी दगाफटका करतील ते सांगता येत नाही. त्यांची सिस्टिम सुद्धा तशीच आहे. त्याची किंमत आज इराण चुकवतोय.

US Israel Iran Conflict : वेळेला चिनी सिस्टिमकडून मोठा धोका म्हणून आज इराणची झाली अशी अवस्था
Jinping Image Credit source: x
| Updated on: Mar 02, 2026 | 1:20 PM
Share

इस्रायल आणि अमेरिकेने एकाचवेळी संयुक्त कारवाई करुन इराणमध्ये मोठा विद्ध्वंस घडवून आणला. इस्रायल आणि अमेरिकेने परस्परांशी समन्वय साधून हल्ले केले. इराणच्या वेगवेगळ्या शहरात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी व वित्तहानी झाली. या हल्ल्यामुळे इराणची एअर डिफेन्स सिस्टिम किती कुचकामी आहे, ते सिद्ध झालं. येणारे फायटर जेट्स आणि मिसाइल्स रोखण्यात ही सिस्टिम कमी पडली. आपली हवाई सुरक्षा अभेद्य करण्यासाठी इराणने नुकतीच चीनकडून HQ-9B एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेतली होती. पण चिनी माल वेळेला कसा धोका देऊ शकतो, ते दुसऱ्यांदा जगासमोर आलं. याआधी ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सुद्धा HQ-9B एअर डिफेन्स सिस्टिम निष्प्रभ ठरली होती. भारताने पाकिस्तानचं हे हवाई सुरक्षा कवच भेदून आपल्याला हवे तिथे, हवे तसे हल्ले केले होते. आता HQ-9B च्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय.

चायना एअरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशनने HQ-9B सिस्टिमची निर्मिती केली आहे. रशियाच्या S-300PMU आणि अमेरिकेत्या पॅट्रियट PAC-2 पासून प्रेरणा घेऊन ही सिस्टिम बनवण्यात आली आहे. चीनची स्वदेशी बनावटीची ही एअर डिफेन्स सिस्टिम आहे. 2006 साली पहिल्यांदा या सिस्टिमची चाचणी घेण्यात आली. मागच्या दशकभरापासून चीन या सिस्टिमचा वापर करत आहे. 260 किलोमीटरपर्यंत HQ-9B ची रेंज असून 50 किमी उंचीवरील मिसाइल्स, विमानांना ही सिस्टिम टार्गेट करु शकते.

कुठे तैनात होती ही सिस्टिम?

HQ-9B एकाचवेळी 6 ते 8 टार्गेट्सचा वेध घेऊ शकते. बीजिंग, तिबेट आणि दक्षिण चीन सागरी क्षेत्रात ही सिस्टिम तैनात आहे. जमिनीवरुन हवेतील उडत्या लक्ष्याचा वेध घेणारी ही सिस्टिम आहे. इराणचं इस्रायल बरोबर जून 2025 मध्ये सुद्धा युद्धा झालं होतं. त्यावेळी S-300PMU सिस्टिमने खूप खराब कामगिरी केलेली. म्हणून इराणने चीनकडून HQ-9B एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेतली. इराणकडून नातांझ अणूऊर्जा प्रकल्प, फॉर्दो, IRGC मुख्यालय, UAV तळ आणि एअर बेसेस अशा ठिकाणी ही सिस्टिम तैनात केली होती. चीनकडून शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये मोठे दावे केले जातात. पण वास्तवात ते किती पोकळ आहे हे दिसून येतय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...