
Iran Clash : सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात मोठा वाद चालू आहे. कोणत्याही क्षणी आम्ही इराणवर हल्ला करू असा इशारा अमरिकेकडून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकन लष्कराने सैन्य तैनातही केलेले आहे. एकीकडे दोन्ही देशांमधील वाद मिटावा यासाठी चर्चा आणि बैठका चालू असताना दुसरीडे अमेरिकेकडून इरावर हल्ला करण्याचा इशारा दिला जातोय. दुसरीकडे अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला तर आम्हीदेखील जशास तसे उत्तर देऊ, असे इराणकडून सांगितले जात आहे. असे असतानाच आता इराणधून हादवरून टाकणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इराणमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला असून यात मुजाहिद्दीन-ए-खल्क या संघटनेच्या 100 पेक्षा जास्त सदस्यांना ठार करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सध्या इराणमध्ये इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डी (आयआरजीसी) आणि मुजाहिद्दीन ए खल्क (MEK) यांच्यात मोठा संघर्ष झाला आहे. आयआरजीसीने एमईकेच्या साधारण 100 सदस्यांना ठार केले आहे. तसा दावा आयआरजीसीकडून केला जातोय. एमईके या संघटनेकडून सध्याच्या इराणमधील इस्लामिक सरकारकचा विरोध केला जातो. तर आयआरजीसी हा एक सैन्यांचे यूनिट आहे. हा सैन्यसमूह थेट इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या समर्थनार्थ काम करतो. शिया-मार्क्सवादी गटाने इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामैनी यांच्या मुख्यालयावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आयआरसीजी आणि एमआके यांच्यात हा संघर्ष निर्माण झाला. याच संघर्षात एमईकेचे 100 सैनिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे.
इराणची शासकीय माध्यम एजन्सी आणइ हिज्बुल्लाह संघटनेशी संबंध असलेल्या वृत्तपत्रानेदेखील या संघर्षाबाबत वृत्त दिले आहे. IRGC आणि MEK यांच्यातील लढाई ही मोताहारी कॉम्पेल्क्सच्या परिसरात झाली आहे. इराणमधील मोताहारी कॉम्प्लेक्स हे तेहराणमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था असलेल्या भागात आहे. याच भागात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामैनी यांचे मुख्यालय आहे. याच कॉम्प्लेक्समध्ये खामैनींचे मुख्यालय, गार्डियन काऊन्सील, इन्टेलिजेन्स मिनिस्टर ऑफिस, ज्युडिशियरी सेंट्रल ऑफिस, सुप्रीम नॅशनल सिक्योरिटी काऊन्सील, खामैनी यांचे पुत्र मोजतबा यांचे कार्यालय आहे.
दरम्यान, एमईकेच्या दाव्यानुसार मृतांमध्ये सरकारला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या जास्त होती. आम्ही केलेला हा हल्ला यशस्वी ठरला असा दावा एमईकेकडून केला जातोय. तर ईराण सरकार हा हल्ला आम्ही परतवून लावला असे सांगत आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.