AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Iran Ceasefire : इराण-अमेरिका युद्धात भारताशेजारच्या देशाने खाल्ला भाव, युद्धावर थेट राजधानीत चर्चा; भारतासाठी धोक्याची घंटा ?

गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षाला तात्पुरता युद्धविराम मिळाला आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराण इस्लामाबादमध्ये 10 एप्रिल रोजी शांतता चर्चा करणार आहेत. सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्तनेही या युद्धविरामात महत्त्वाची भूमिका बजावली. या चर्चेतून दोन्ही देशांमधील वाद मिटवून निर्णायक शांतता करार होण्याची अपेक्षा आहे.

US Iran Ceasefire : इराण-अमेरिका युद्धात भारताशेजारच्या देशाने खाल्ला भाव, युद्धावर थेट राजधानीत चर्चा; भारतासाठी धोक्याची घंटा ?
इराण-अमेरिका युद्धविराम
| Updated on: Apr 08, 2026 | 12:46 PM
Share

गेल्या 40 दिवसांपासून युद्धाचे चटके सहन करणाऱ्या जगाने अखेर सुटकेचा नि:श्वास टाकला. इराण वि अमेरिका-इस्रायलमध्ये सुरू असलेल्या या युद्धाने सगळेच होरपळे होते. मात्र अखेर आज अमेरिका आणि इराणने एक पाऊल पुढे टाकत युद्धविरामाची घोषणा केली. पुढल्या दोन आठवड्यांसाठी आता हल्ले होणार नसून हा तात्पुरता विराम आहे की पुढे जाऊन याचं रुपांतर युद्ध संपण्यातच होईल, हे येत्या काही काळात स्पष्ट होईल. दरम्यान अमेरिका आणि इराणला या युद्धविरामासाठी राजी करण्यात पाकिस्तानचा विशेष सहभाग होता असं बोललं जातं आहे. ट्रम्प यांनी केलेल्या युद्धविरामाच्या घोषेनंतर त्यांनी पाकिस्तानचेहीआभार मानले होते. पाकव्यतिरिक्त, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. युद्धविरामाच्या घोषणेनंतर, पाकिस्तानने बुधवारी अमेरिका आणि इराणला चर्चेसाठी इस्लामाबादला आमंत्रित केलं आहे. येत्या 10 तारखेला, शुक्रवारी दोन्ही देशांमधील वाटाघाटी, चर्चेला सुरूवात होणार आहे.

 इस्लामाबादमध्ये इराण-अमेरिका करणार चर्चा

यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीच विधान केलं. इराण व अमेरिका या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांतील अधिकाऱ्यांना समोरासमोर चर्चेसाठी पाकिस्तानने 10 एप्रिल रोजी आमंत्रित केलं आहे. सर्व वादांचे निराकरण करण्यासाठी निर्णायक करारावर पोहोचणे हे या चर्चेचं उद्दिष्ट आहे. अमेरिका इराणी संस्कृती नष्ट करेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिल्यावर, या संघर्षाने एक महत्त्वाचे वळण घेतले. मात्र मंगळवारची डेडलाइन संपण्याआधीच दोन्ही देशांनी एक पाऊल पुढे टाकत युद्धविरामावर सहमती दर्शवली. होर्मुजची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची तयारी दाखवल तर हल्ले थांबवू असे संकेत ट्रम्प यांनी दिल्यावर, इराणने युद्धविरामाा हा निर्णय घेतला.

ट्रम्प यांचे विशेष दूत, उपराष्ट्रपती आणि जावई यांचा चर्चेत असेल समावेश

इराण व अमेरिके दरम्यान इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेसंदर्भात, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सीएनएनला प्रतिक्रिया दिली. , “लोक बोलत असतात, पण जोपर्यंत राष्ट्राध्यक्ष किंवा व्हाईट हाऊसकडून काही सांगितले जात नाही, तोपर्यंत काहीही अंतिम नाही.” मात्र, ही बैठक इस्लामाबादमध्ये एका पाकिस्तानी मध्यस्थाच्या उपस्थितीत होईल, असं इतर अधिकाऱ्यांनी सीएनएनला सांगितलं. तसेच या बैठकीदरम्यान, ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ, जावई जेरेड कुशनर आणि उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यात सहभागी होऊ शकतात असंही त्यांनी नमूद केलं.

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने