इराणकडून भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडलंय, 1800 किलोमीटरवर उडाला भडका, मोठं संकट, इराणने..

इराण आणि अमेरिका संघर्ष पेटला आहे. मात्र, या युद्धाची झळ जगातील सर्वच देशांना बसत आहे. यादरम्यानच भारताच्या उंबरठ्यावर मोठं संकट निर्माण झालं. भारत होर्मुज खाडीतून मार्ग काढत असताना ज्याची भीती तेच पाऊस इराणकडून उचलण्यात आले.

इराणकडून भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडलंय, 1800 किलोमीटरवर उडाला भडका, मोठं संकट, इराणने..
Iran attack on Diego Garcia
| Updated on: Mar 21, 2026 | 11:37 AM

इराण आणि अमेरिका युद्धाचे परिणाम दिसून येत आहेत. संपूर्ण जगाला या युद्धाचा फटका बसत आहे. जगात ऊर्जेचे मोठे संकट उभं आहे. तेल रिफायनरीसह गॅस प्रकल्पांवर हल्ले होत आहेत. इस्रायलने पश्चिम आशियाच्या त्या भागावर हल्ला केला आहे, जो जगाला ऊर्जा पुरवतो. हा प्रदेश जगाला ऊर्जा, पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवतो. तिथेच इस्त्रायलने घात घातला, त्याने खळबळ उडाली. इराणच्या एका ऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाला, त्यानंतर इराणकडून साैदी अरेबिया आणि कतार देशांना टार्गेट करत थेट तिथे असलेल्या गॅसच्या प्रकल्पांवर हल्ला करण्यात आला. यामुळे जगातील पेट्रोलियम उत्पादने आणि वायू पुरवठ्यावर भयंकर परिणाम झाला. पुरवठ्यात व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. होर्मुज सामुद्रधुनीतही मोठी खळबळ आहे. इराणकडून एकही जहाज पुढे जाऊ दिले जात नाही. ऊर्जा पुरवठा धोक्यात आहे. हे युद्ध कधी संपणार हे सांगणे कठीण आहे, पण जगातील ऊर्जा पुरवठा धोक्यात आल्याचे बघायला मिळत आहे.

मुळात म्हणजे इराण आणि अमेरिका युद्ध हिंद महासागरात पोहोचले आहे. डिएगो गार्सियासह अनेक लष्कर तळांवर मोठे हल्ले केले जात आहेत. इराणने केलेल्या या हल्ल्यात कोणी ठार झाले नाही पण नुकसान अधिक झाले. यामुळे युद्ध अधिक भडकण्याची शक्यता आहे. इराणच्या या निर्णयामुळे युद्धाची आग आणखी भडकण्याचा धोका आहे. हिंद महासागर क्षेत्रही प्रभावित झाले तर त्याचा सामना करणे भारतासाठी आणखी एक मोठे आव्हान नक्कीच असणार आहे.

इराणने क्षेपणास्त्र डागलेले डिएगो गार्सिया ठिकाण भारतापासून 1800 किलोमीटर आहे. हिंद महासागर हा भारतासाठी एक प्रमुख वाहतूक मार्ग आहे. ज्यामुळे तिथे कोणतीही अशांतता आणि संघर्ष भारतासाठी अजिबात चांगले नाही. तिथे शांतता रहाणे कायम भारतासाठी चांगले असेल.

होर्मुज खाडीत अगोदरच भयंकर अशांतता आहे. जर ही अशांतता हिंद महासागरात पोहोचली तर ही भारतासाठी अत्यंत धोकादायक घंटा नक्कीच ठरू शकते. इतर उत्पादनांवरही याचा परिणाम होऊ शकतो. हिंद महासागर हे भारतासाठी एक जलद्वार आहे त्यामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे संघर्ष नको आहे. अगोदरच होर्मुज खाडीतून मार्ग काढता काढता भारताला नाकीनऊ आलेत, त्यामध्ये हा हल्ला म्हणजे भारताचे टेन्शन वाढवणारा नक्कीच ठरू शकतो.

Follow Us