AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य-पूर्वेतील लढाईत इराकची एंट्री? अमेरिकेच्या सैन्य तळावर भीषण हल्ले, इराणला प्रत्युत्तर देणार?

Iran attack US Base: इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणमध्ये भीषण हल्ले चढवले. त्यात सुप्रीम नेता अयातुल्ला खोमेनी हे कुटुंबासह ठार झाले. पण इराणचे हल्ले थांबलेले नाही. दरम्यान मध्य-पूर्वेत अजून एका देशातील अमेरिकन तळावर हल्ला झाला. त्यामुळे या परिसरात युद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

मध्य-पूर्वेतील लढाईत इराकची एंट्री? अमेरिकेच्या सैन्य तळावर भीषण हल्ले, इराणला प्रत्युत्तर देणार?
आता इराकची युद्धात एंट्री?Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 01, 2026 | 10:25 AM
Share

Middle-East War: इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्तरित्या इराणवर हल्ला चढवला. त्यात इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खोमेनी हे कुटुंबासह ठार झाले. तरीही इराणचे हल्ले थांबलेले नाही. अमेरिका आणि इस्त्रायलला धडा शिकवणार असल्याचा इशारा इराणने दिला आहे. इराणने अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले तीव्र केले आहेत. शेजारील देशातील अमेरिकेच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र डागले आहेत. तर इस्त्रायलवर ताजे हल्ले चढवले आहेत. दरम्यान या तीन देशात युद्ध सुरू असतानाच आता चौथ्या देशाची एंट्री झाली आहे. इराकमधील अमेरिकेच्या सैन्य तळावर भीषण हल्ला चढवला आहे. त्यामुळे मध्य-पूर्व आशियात युद्ध् भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

इराकही इराणवर प्रतिहल्ला करणार?

मध्य-पूर्वेतील या युद्धात इराकची एंट्री झाली आहे. इराकी कुर्दिस्तान भागात अमेरिकन बेसवर हल्ला करण्यात आला आहे. इराण आणि इराक या देशात 1990 मध्ये भीषण युद्ध भडकले होते. इराणला ताब्यात घेण्यासाठी इराक आसुसलेला होता. या देशात पहिला संघर्ष 1980 मध्ये उडाला होता. इराकने अगोदर कुवेतवर हल्ले चढवले आणि नंतर इराण ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पर्शियन गल्फ राष्ट्रांमध्ये महा इराक तयार करण्याचा घाट सद्दाम हुसैन यांनी घातला होता. इराकमध्ये बाथ पक्षाची स्थापना होताच डिक्टेटर सद्दाम हुसैन यांची प्रादेशिक भूक वाढली. त्यांना अनेक देश अंकित करून पर्शियन आखातात, मध्य-पूर्वेत एक मोठे राष्ट्र तयार करण्याचा मनसुबा होता. पण अमेरिकेने हस्तक्षेप करत इराकविरोधात युद्ध जाहीर केले होते. त्यात सद्दाम हुसैन पकडण्यात आले आणि त्यांना फासावर लटकवण्यात आले. पण इराण आणि इराकमधील संबंध कधीही सुरळीत झाले नाही. आता अमेरिकन लष्करी तळावर हल्ला झाल्यापासून तिथले अमेरिकन मर्जीतील सरकार इराणवर हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.

एकही सैनिक जखमी नाही

दरम्यान अमेरिकेच्या लष्कराचे प्रवक्ते कॅप्टन टीम हॉकिन्स यांनी मध्य-पूर्वेत सध्या अमेरिकेचे 30 ते 40 हजार सैनिक असल्याचे नमूद केले. तर अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळावर हल्ला झाला असला तरी त्यात एकही सैनिक मारल्या गेला नाही अथवा जखमी झाला नसल्याचे म्हटले आहे. मध्य-पूर्वेतील अनेक देशात अमेरिकेचे लष्करी तळ असून तिथल्या काही ठिकाणी इराणने हल्ला चढवल्याचे त्यांनी सांगितले. पण अनेक ठिकाणी हे क्षेपणास्त्र हल्ले यशस्वीरित्या परतावून लावल्याचे त्यांनी सांगितले. जे काही नुकसान झाले आहे ते अगदी किरकोळ असून त्याचा लष्कराच्या ऑपरेशनवर काहीच परिणाम झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पण इराक हा जुना बदला घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात अमेरिकन सैन्य इराकमध्ये असल्याने त्याची कितपत गरज पडेल हे सांगता येत नाही. पण संरक्षण तज्ज्ञांच्या मते, इराक आणि इराणमध्ये हाडवैर आहे. इराणने आपल्या भूमीवर हल्ला चढवल्याने तिथले सरकार संतप्त आहे. त्यामुळे इराणवर इराक केव्हाही हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,.
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो.
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय.
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक....
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक.....
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल.
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत.