AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmad Vahidi: कोण आहेत अहमद वाहिदी? अयातुल्ला खोमेनींच्या मृत्यूनंतर इराणचे नवीन कमांडर-इन-चीफ, युद्ध अजून भडकणार?

US Israel Iran War: इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खोमेनी हे इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाले. इराणचे नेतृत्व आता त्यांच्या वारसदारकडे जाईलच. पण देशाच्या लष्करात मोठा खांदेपालट झाला आहे. अहमद वाहिदी हे इराणचे नवीन कमांडर इन चीफ झाले आहेत. कोण आहेत वाहिदी?

Ahmad Vahidi: कोण आहेत अहमद वाहिदी? अयातुल्ला खोमेनींच्या मृत्यूनंतर इराणचे नवीन कमांडर-इन-चीफ, युद्ध अजून भडकणार?
कोण आहेत अहमद वाहिदी? Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 01, 2026 | 9:30 AM
Share

Ahmad Vahidi Iran new commander in chief: इराणचे सुप्रीम नेते आयतुल्ला अली खोमेनी हे अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार झाले. त्यांच्या सोबत कुटुंबातील अनेक जण ठार झाले. तर इकडं लष्करातही मोठा खांदेपालट झाला आहे. या हल्ल्यादरम्यान इराणने नवीन कमांडर इन चीफच्या नावाची घोषणा केली आहे. अहमद वाहिदी हे आता इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रमुख असतील. त्यांना यापूर्वी 31 डिसेंबर 2025 रोजी खोमेनी यांनी वाहिदी यांना डिप्टी कमांडर इन चीफ नियुक्त केले होते. ते अनेक वर्षापासून खोमेनी समर्थक आणि एकनिष्ठ मानले जातात. त्यांनी सूत्र हातात घेताच खोमेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी असा हल्ला करणार की पुढील अनेक वर्ष अमेरिका आणि इस्त्रायलचा थरकाप उडेल अशी धमकी दिली आहे.

कोण आहेत वाहिदी?

वाहिदी कुद्स लष्कराचे पहिले कमांडर (1988-98) होते. ते इराणच्या बाहेरील लष्कर आणि गुप्तहेर संघटनांचे IRGC चे पण प्रमुख होते. ते 2009-2013 या काळात इराणचे संरक्षण मंत्री होते. तर इब्राहिम रईसी यांच्या सरकारमध्ये ते 2021-2024 या काळात गृहमंत्री होते. सुप्रीम नॅशनल डिफेंस युनिव्हर्सिटीचे अध्यक्षपदी त्यांनी भूषवले आहेत. त्यांच्याकडे इराणमधील अनेक पदांचा मोठा अनुभव आहे. ते अयातुल्ला यांचे खास विश्वासू आहेत.

1994 मध्ये अर्जेंटिना येथील ब्यूनस आयर्स येथे AMIA ज्यू केंद्रात स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यामागे वाहिदी असल्याचा दाट संशय व्यक्त करत इंटरपोलने त्यांच्याविरोधात रेड नोटीस बजावली होती. या स्फोटात 85 ज्यू लोकांसह इतरांचा मृत्यू झाला होता. वाहिदी यांच्यावर युरोपियन संघ आणि अमेरिकेने अनेक प्रतिबंध लावलेले आहेत. इराणचा अणू कार्यक्रम राबवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आणि 2022 मधील विरोध प्रदर्शन मोडून काढण्यासाठी क्रूर पद्धत वापरल्याचा वाहिदींवर आरोप आहे.

वाहिदी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर

वाहिदी यांचा जन्म 27 जून 1958 मध्ये इराणच्या शिराज शहरात झाला. वाहिदी यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी आहे. औद्योगिक इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि धोरणात्मक विषयात पीएचडी केलेली आहेत. अहमद शाहचेरागी हे त्यांचं जन्म नाव आहे. इराणच्या लष्करी धोरणामागील मेंदू वाहिदी असल्याचे मानले जाते. तर अणू कार्यक्रमासाठी विविध देशातून युरेनियम आणण्यापासून ते अणवस्त्र विकास कार्यक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे म्हटले जाते. विविध देशातून शस्त्रास्त्रे खरेदी, आधुनिक शस्त्रे आणणे, ही शस्त्रे हुती आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांना पुरवणे. अमेरिकच्या मित्र राष्ट्रात हेरगिरी करणे ही कामे वाहिदी लिलया पूर्ण करतात. त्यामुळे खोमेनी यांचा त्यांच्यावर अधिक विश्वास आहे. त्याचे फळ त्यांना मिळाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...