इराणकडून इस्त्रायलवर दर मिनिटाला 3 क्षेपणास्त्रे हल्ले, बेंजामिन नेतान्याहू होते लक्ष्य?

इस्रायलकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले करण्यात आले. इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशांमधील तणावामुळे पूर्ण युद्धाची चिंता निर्माण झाली आहे. यापूर्वीच तणावग्रस्त असलेला हा भाग आणखी अशांततेत ढकलला गेला आहे.

इराणकडून इस्त्रायलवर दर मिनिटाला 3 क्षेपणास्त्रे हल्ले, बेंजामिन नेतान्याहू होते लक्ष्य?
इराणकडून इस्त्रायलवर हल्ले (फाईल फोटो)
| Updated on: Jun 14, 2025 | 7:38 AM

इस्रायल आणि इराण युद्धाने आता भडका घेतला आहे. इस्त्रायलने शुक्रवारी इराणच्या अणु आणि लष्करी तळांना लक्ष्य केले होते. त्यात इराणचे दोन अणू शास्त्रज्ञ आणि लष्कराच्या कमांडरचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणाने इस्त्रायलला प्रत्युत्तर म्हणून हल्ले सुरु केले. रात्री उशिरा शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी इराणने इस्रायलवर हल्ला केला. इराण इंटरनॅशनलच्या मते, इराणने इस्रायलवर सुमारे ३ टप्प्यात ६५ मिनिटे हल्ला केला. त्यात सुमारे २०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. म्हणजे या काळात  दर मिनिटाला जवळपास तीन क्षेपणास्त्र हल्ले झाले.

इराणकडून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचे लक्ष्य इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित कार्यालये होती. त्याच ठिकाणी पंतप्रधान नेतान्याहू बसतात. या हल्ल्यांमुळे जेरुसलेम आणि तेल अवीवचे आकाश स्फोटांनी भरले गेले. इराणच्या हल्ल्यानंतर तेल अवीव परिसरातील काही जण जखमी झाले. एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव सांगितले की, या प्रदेशातील अमेरिकन हवाई संरक्षण प्रणाली इराणी क्षेपणास्त्रांना पाडण्यास मदत करत आहेत.

इराणमध्ये जनतेकडून आनंद

इस्रायलकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले करण्यात आले. इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशांमधील तणावामुळे पूर्ण युद्धाची चिंता निर्माण झाली आहे. यापूर्वीच तणावग्रस्त असलेला हा भाग आणखी अशांततेत ढकलला गेला आहे. इस्त्रायलवर हल्ला करण्यापूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी म्हटले होते की, आम्ही इस्रायलला या गुन्ह्यातून सुरक्षितपणे सुटू देणार नाही. यादरम्यान खामेनी यांनी बदला घेण्याची शपथही घेतली.

इराणच्या सैन्याने इस्रायलला प्रत्युत्तर दिले. यानंतर राजधानी तेहरानमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. लोक रस्त्यावर उतरून आनंद साजरा करत होते. इराणच्या सैन्याला नवीन प्रमुख कमांडर मिळाला आहे. कमांडर-इन-चीफ अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या आदेशानुसार मेजर जनरल अमीर हतामी यांची इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सैन्याचे मुख्य कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इस्रायली माध्यमांनुसार, इराणच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि डझनभर जखमी झाले. इराणच्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची शुक्रवारी बैठक झाली. इराणाने संयुक्त राष्ट्राला पत्र लिहिले.