इस्त्रायलमध्ये मोठा हाहाकार! इराणच्या सर्वाेच्च नेत्याची निवड होताच एका मागून एक तब्बल..

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धादरम्यान इराणकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. इराणकडून त्यांच्या सर्वाेच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज दहावा दिवस आहे. यादरम्यानच ही घोषणा करण्यात आली.

इस्त्रायलमध्ये मोठा हाहाकार! इराणच्या सर्वाेच्च नेत्याची निवड होताच एका मागून एक तब्बल..
Iran missile fire
| Updated on: Mar 09, 2026 | 12:50 PM

इराण आणि इस्त्रायलयच्या युद्धाचा आज 10 वा दिवस आहे. जसे जसे हे युद्ध पुढे जात आहेत, तसे अधिक घातक होत आहे. तेहरानमधील तेल डेपोवर मोठा हल्ला करण्यात आला. यासोबतच गॅस पाईपलाईनवरही हल्ला केला जात आहे. इराणच्या तेहरानला सर्वाधिक या युद्धाचा झळा बसत आहे. आखाती देशांचेही मोठे नुकसान या हल्ल्यात होत आहे. मिसाईल हल्ले इराणकडून केले जात आहेत. इराणला मोठा इशारा साैदी अरेबियाकडून देण्यात आला. साैदीतील मोठ्या मोठ्या इमारतींना टार्गेट करून हल्ला केला जात आहे. या युद्धात साैदी अरेबियाचे अत्यंत मोठे नुकसान झाले. आता या हल्ल्यांबद्दल थेट इशारा देण्यात आला. इस्त्रायल आणि अमेरिकेने हल्ला केल्यानंतर सर्वात अगोदर इराणकडून आखाती देशात असलेली रडार स्टिटम खराब करण्यात आली. ज्यामुळे होणाऱ्या हल्ल्याची कोणताही कल्पना आखाती देशांना मिळत नाहीये आणि थेट मोठे हल्ले होत आहेत.

इराणकडून या युद्धाच्या परिस्थितीमध्ये नव्या सर्वाेच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. अयातुल्लाह मोज्तबा खामेनेई आता इराणचे नवे सर्वाेच्च नेते आहेत. मात्र, सर्वाेच्च नेते मोज्तबा खामेनेई यांना मानत नसल्याचे अमेरिकेने म्हटले, फक्त हेच नाही तर त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, इराणचा हा सर्वाेच्च नेता बऱ्याच दिवस राहणार नाही. अमेरिकेकडून हल्ल्यात इराणच्या सर्वाेच्च नेत्याला टार्गेट केले जात आहे. आतापर्यंत दोन सर्वाेच्च नेत्याना अमेरिकेने संपले.

दहा दिवसांच्या युद्धात दोन सर्वाेच्च नेत्यांना अमेरिकेने हल्ल्यात ठार केले. आता मोज्तबा खामेनेई यांनी इराणच्या सर्वाेच्च नेत्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच इस्त्रायलवर घातक क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केला. मोज्तबा खामेनेई यांच्या नियुक्तींतर इराणकडून क्षेपणास्त्राचा पहिला मारा केला.

आता हे युद्ध अधिक घातक होण्याचे संकेत आहे. पुन्हा इराणकडून महत्वाचा समुद्री मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. युद्धानंतर समुद्री मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र, पुन्हा तो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आता परत बंद करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा टॅंकर अडकल्याचे बघयाला मिळत आहे. हे युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us