AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाचे टेन्शन वाढले, इराणची इस्त्रायल आणि अमेरिका सोडून या देशाला थेट धमकी, प्रचंड…

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. या युद्धात ब्रिटनच्या भूमिका वापर केला जात असल्याने इराणचा चांगलाच संताप झाल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच इराणकडून थेटपणे ब्रिटनला इशारा देण्यात आला. इराणकडून दुबईमध्येही मोठे हल्ले करण्यात आली आहेत.

जगाचे टेन्शन वाढले, इराणची इस्त्रायल आणि अमेरिका सोडून या देशाला थेट धमकी, प्रचंड...
Iran
| Updated on: Mar 21, 2026 | 1:23 PM
Share

इराणसोबतच्या युद्धात अमेरिका कुठे ना कुठे मागे पडल्याचे बघायला मिळत आहे. इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने अमेरिकेसह अनेक देश संकटात आहेत. अमेरिकेने ही खाडी सुरक्षित करण्याकरिता मोठे पाऊल उचलली. फक्त पाऊलेच नाही तर अमेरिकेने थेट भूमिका घेत काही देशांना होर्मुज खाडीत युद्धनाैका पाठवण्याचे आवाहन केले. मात्र, अमेरिकेच्या मदतीला एकही देश पुढे आला नाही. एकला चलो रे ची भूमिका घेत अमेरिकेने काही हल्ले होर्मुज खाडीत केले आणि ती सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. पण होर्मुज खाडी इराणच्या तावडीतून घेऊन सुरक्षित करणे शक्य नसल्याचे लक्षात येताच अमेरिकेने होर्मुज खाडी सुरक्षित करण्याची जबाबदारी अमेरिकेची नसल्याचे सांगत हात झटकून टाकले. यासोबतच जे देश ही खाडी वापरतात त्यांची ही खाडी सुरक्षित करण्याची जबाबदारी असल्याचे म्हटले.

अमेरिका युद्धात चारही बाजूने घेरल्यानंतर इराण अधिक घातक झाला असून मोठे क्षेपणास्त्र हल्ले इराणकडून केले जात आहेत. इराणकडून हिंद महासागरातील अमेरिका आणि ब्रिटेनच्या सैन्य बेस डिएगो गार्सियावर बैलिस्टिक मिसाईलच्या माध्यमातून हल्ला केला. हा अमेरिकेसाठी मोठा घाव आहे.

याच हिंद महासागरात अमेरिकेने इराणी युद्धनाैकेवर भारतातून युद्ध सराव करून जाणाऱ्या हल्ला केला होता. ज्यात 85 इराणी सैनिक मारले गेले होते. यादरम्यानच दुबईमध्येही मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. अनेक भागात बॉम्ब हल्ल्याचे मोठे आवाज आली. इराणचे विदेश मंत्र सय्यद अब्बास अरघची यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्यावर मोठी टीका केली.

अराघची यांनी म्हटले की, स्टार्मर हे त्यांच्या लोकांच्या विरोधात जाऊन ब्रिटिश ठिकाणांना इराणविरोधात वापरण्याकरिता देत आहेत. थेट इशारा देत त्यांनी म्हटले की, ब्रिटिश नागरिक धोक्यात आहेत. इराण आपले संरक्षण करण्याकरिता सक्षम आहे. आमचे स्पष्ट मत आहे की, ब्रिटनची ही भूमिका म्हणजे ते थेटपणे या युद्धात उतरत आहेत. आता इराण थेट ब्रिटनवर संतापल्याचे बघायला मिळत आहे. इराण या युद्धात घातक भूमिका घेताना दिसत आहे.

Follow Us
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण
भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
Bharat Gogawale | रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश
विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला...
Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले...
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास..
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं