AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला इराण आणि अमेरिका युद्धात ज्याची प्रतिक्षा ती आनंदाची बातमी आलीच, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव, थेट युद्धात…

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 20 वा दिवस आहे. यादरम्यान अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. इराण एकटा लढत असूनही युद्धात पुढे आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. यादरम्यान अमेरिकेने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे.

जगाला इराण आणि अमेरिका युद्धात ज्याची प्रतिक्षा ती आनंदाची बातमी आलीच, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव, थेट युद्धात...
Donald Trump
| Updated on: Mar 21, 2026 | 12:54 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाने जग जैरीस आलंय. आज या युद्धाला 20 दिवस पूर्ण झाली. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. सतत मोठे हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने आणि इस्त्रायलने ज्यापद्धतीने इराणवर हल्ला केला, त्यानंतर त्यांनी अजिबात विचार केला नाही की, पुढच्या काही दिवसांमध्ये ही स्थिती होईल. प्लॅनिंग करून हा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेने केला. त्यांच्या या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. मात्र, त्यानंतरही युद्धाच्या 20 वा दिवशीही इराण ताट मानेने उभा आहे. इराणच्या सर्वाेच्च नेत्याला ठार केल्यानंतर इराण फार काही करणार नाही, ही भावना अमेरिकेची होती. मात्र, सर्वकाही उलट घडले आणि थेट अमेरिकेच्या लष्कर तळांवर मोठे हल्ले इराणकडून करण्यात आले. अमेरिकेने मोठे नुकसान या युद्धात होताना दिसत आहे एलपीजी गॅस आणि तेलाचे संकट अधिक वाढताना दिसत आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने जगातील अनेक देशांची वाट लागली. थेट अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होताना दिसत आहे.

आखाती देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आखाती देशांमध्ये मोठे हल्ले केले जात आहेत. हेच नाही तर आखाती देश अमेरिकेवर नाराज आहेत. गॅस आणि तेल प्रकल्प सुद्धा सुरक्षित राहिलेले नाहीत. भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाच्या तुटवड्याचे संकट आहे. शेवटी या युद्धात अमेरिका माघार घेताना दिसत आहे. तसे स्पष्टपणे थेट संकेतही दिले जात आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरून स्पष्ट दिसत आहे की, त्यांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे. ट्रुथआउट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केली. या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, होर्मुज सामुद्रधुनीचे रक्षण करण्याची आणि त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही जे देश त्याचा वापर करत आहेत, त्यांची आहे.

अमेरिकेची अजिबात नाही. जर कोणी मागणी केली तर आम्ही होर्मज खाडीतील तणाव कमी करण्याच्या चर्चेत मदत नक्कीच करू. पण इराणचा धोका संपल्यानंतर त्याची गरज भासणार नाही. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्यानंतर अमेरिकेने ही खाडी सुरू ठेवण्याकरिता काही प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता त्यांनी काही देशांची मदतही मागितली. पण त्यांना यश मिळाले नाही. आता होर्मुज खाडीबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका स्पष्ट केली.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?