AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचे संकट, इराणचा धक्कादायक निर्णय, पूर्णपणे..

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला. इराणच्या मुख्य शहरांवर मोठे हल्ले अमेरिकेने केले. आजही हल्ले करणार आहेत. यादरम्यानच आता इराणकडून होर्मुज खाडी पूर्णपणे बंद करण्यात आली. कोणतेही जहाज होर्मुज खाडीतून जाऊ शकणार नाही.

भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचे संकट, इराणचा धक्कादायक निर्णय, पूर्णपणे..
Strait of Hormuz
| Updated on: Jun 11, 2026 | 7:46 AM
Share

होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. इराणवर अमेरिकेने हल्ला केला. हेच नाही तर अजूनही मोठे हल्ले करण्याचे आदेश आहेत. अमेरिकी लष्कराचे हेलिकॉप्टर इराणने पाडल्याचे आरोप करत अमेरिकेने हल्ला केला. मात्र, खोटी आरोप करून अमेरिका हल्ला करत असल्याचे थेट इराणने म्हटले. इराणने देखील अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ले केले. यादरम्यानच जगाची झोप उडवणारा निर्णय नुकताच इराणकडून घेण्यात आला. इराणने थेट होर्मुज खाडी बंद केली. अमेरिकेच्या तटबंदीनंतर इराण इतर देशांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देत होता. होर्मुज खाडीतून कमी प्रमाणात का होय ना जहाज ये-जा करत होते. भारतात त्याच मार्गे कच्चे तेल दाखल होत होते. मात्र, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर त्यांनी होर्मुज खाडी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जगातील सर्वात महत्वाच्या जलमार्गापैकी एक असलेला होर्मुज मार्ग सध्याच्या घडीला पूर्णपणे बंद आहे. ज्यामुळे भारतावर पुन्हा एकदा संकट येऊ शकते.

इराणने थेट धमकी दिली की, होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजाला उडवले जाईल, इराणच्या मुख्य दोन शहरांमध्ये अमेरिकेकडून मोठा हल्ला करण्यात आला. त्यानंतर इराणने हा निर्णय घेतला. मिडिया रिपोर्टनुसार, इराणने होर्मुज खाडी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यांनी या आदेशात स्पष्ट म्हटले की, तेल जहाज किंवा कोणत्याही जहाजाला या मार्गे जाऊ दिले जाणार नाही.

जर कोणी जहाज होर्मुज खाडी पार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला उडवले जाईल. आता होर्मुज खाडी प्रत्येक जहाजाकरिता बंद करण्यात आली. बंदार, सिरिक, केश्म आणि इराणच्या अजून बऱ्याच शहरांमध्ये अमेरिकेने हल्ला केला. आज पुन्हा इराणवर हल्ला करण्याची धमकी अमेरिकेने दिलीये. दुसरीकडे इराणचे राष्ट्रपती पेजेश्कियान यांनी म्हटले की, इराण कोणत्याही धमकी या दबावाकरिता खंबीरपणे उभा आहे.

यादरम्यान माहिती मिळत आहे की, दोन जहाजांना होर्मुज खाडी पार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर थेट निशाणा साधत उडवण्यात आले. मात्र, हे जहाज नक्की कोणत्या देशाची होती, याबाबत माहिती मिळू शकली नाहीये. भारतात 40 टक्के तेल आणि 50 टक्के एलपीजी गॅस होर्मुज खाडीच्या मार्गातूनच येतो. ज्यामुळे आता होर्मुज खाडी पूर्णपणे बंद असल्याने भारतावर संकट आहे.

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट...
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट संपली, बैठकीत...
अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
रात्रभर झोप नव्हती... अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर...
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर दमानियांची सुचक प्रतिक्रिया
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या...
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...