Iran Israel : युद्धानंतर मोसाद अजून डेंजर, सुप्रीम लीडर खामनेईला दिला मोठा दणका

Iran Israel : इराण-इस्रायलमध्ये चाललेलं भीषण युद्ध 12 दिवसानंतर थांबलं. पण आता या युद्धानंतर इराणमध्ये अजून भीषण घडतय. मोसादने इराणच्या सुप्रीम लीडरला मोठा दणका दिलाय. हा दणका असा आहे की, अयातुल्ला अली खामेनेई अजून तरी काही दिवस बंकरमधून बाहेर पडणार नाही. मोसाद ही जगातील सर्वात धोकादायक गुप्तचर संघटना आहे.

Iran Israel : युद्धानंतर मोसाद अजून डेंजर, सुप्रीम लीडर खामनेईला दिला मोठा दणका
Iran Israel
| Updated on: Jul 14, 2025 | 3:35 PM

इराण-इस्रायलमधील सीजफायरला तीन आठवडे होणार आहेत. मिसाइल्स आणि फायटर जेट्समधून होणारा बॉम्ब वर्षाव थांबला आहे. पण इराणमध्ये मोसादचे ऑपरेशन्स अजूनही सुरु आहेत. इराणचे टॉप अधिकारी मोसाद एजंट्सच्या टार्गेटवर आहेत. याचा पुरावा तेहरानमध्ये झालेली अली ताएब यांची हत्या आहे. अली ताएब हे इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेईचे निकटवर्तीय होते. त्यांच्या हत्येमध्ये मोसादचा हात असल्याच संशय आहे. अली ताएब यांची हत्या ही इराणमध्ये सुरु होणाऱ्या हत्या सत्राची सुरुवात मानली जात आहे. खामेनेईच्या मृत्यूपर्यंत हा सिलसिला थांबणार नाही, असं म्हटलं जातय.

हे कोणालाच माहित नाही, इराणमध्ये कुठल्या गोळीवर इराणच्या सुप्रीम लीडरच नाव लिहिलेलं आहे. कुठलं ड्रोन इराणी राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्या हत्येच कारण बनेल. या भितीच मुख्य कारण मोसादच इराणमध्ये सुरु असलेलं ऑपरेशन आहे. इराण-इस्रायल युद्ध समाप्त होऊन 20 दिवस झालेत. पण इराणमध्ये मोसादचे एजेंट्स अजूनही सक्रीय आहेत. घात लावून खामेनेईच्या जवळच्या माणसांची हत्या करत आहेत.

मृत्यू 9 जुलैला खुलासा कधी झाला?

अली ताएब हे मोसादच सर्वात लेटेस्ट टार्गेट बनलेत. खामेनेई यांचे निकटवर्तीय अली ताएबचा रहस्यमयी परिस्थितीचा मृत्यू झालं. ईरानी मीडिया रिपोर्ट्सनुसार या हत्येमागे मोसादचा हात आहे. अली ताएब जास्त चर्चेत नसायचे. ते गोपनीयरित्या खामेनेई यांच्यासाठी काम करायचे. साराल्लाह हेडक्वार्टरमध्ये ते खामेनेईचे प्रतिनिधी होते. काही इराणी रिपोर्ट्सनुसार 9 जुलैला त्यांचा मृत्यू झाला. याचा खुलासा 12 जुलै रोजी झाला.

कशी केली हत्या?

तेहरानच्या चितगर भागात अली ताएबचा मृत्यू झाला. इमारतीच्या एका अपार्टमेन्टमध्ये स्फोट झाल्याची बातमी समोर आलेली. त्याच्या 72 तासानंतर अली ताएबच्या मृत्यूचा दावा करण्यात आला. या इमारतीत स्फोट झाला, त्यावेळी अली ताएब तिथे उपस्थित होते. अली ताएबचा मृत्यू हा इराणच्या सुप्रीम लीडरसाठी मोठा झटका आहे. कारण ते खामेनेई यांचे डोळे, कान मानले जायचे. कुठल्याही चर्चेत न राहता ते खामेनेई पर्यंत प्रत्येक सिक्रेट माहिती पोहोचवायचे. याच कारणामुळे IRGC च्या साराल्लाह हेडक्वार्टरमध्ये खामेनेई यांनी दीर्घकाळ त्यांना आपलं प्रतिनिधी म्हणून ठेवलं होतं.