AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खामेनेई, मुलगा-जावई-सून, टॉप कमांडर.. इस्रायल-अमेरिकेनं यांचा केला खात्मा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर इराणने 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. खामेनेई यांच्यासोबतच इराणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे.

खामेनेई, मुलगा-जावई-सून, टॉप कमांडर.. इस्रायल-अमेरिकेनं यांचा केला खात्मा
अयातुल्लाह अली खामेनेईImage Credit source: Getty images
| Updated on: Mar 01, 2026 | 1:55 PM
Share

अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. इराणने 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूमुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. इराणने अमेरिकेच्या 14 लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. यामध्ये शेकडो अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दुबईतील सीआयएची एक सुविधा क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्ध्वस्त झाली. तर दुसरीकडे इस्रायलकडून इराणवर जोरदार हल्ले झाले. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात 40 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.

खामेनेई यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये त्यांची मुलगी, नात, जावई मोहताबा खामेनेई आणि सून झहरा हद्दाद अदेल यांचाही समावेश होता. या संयुक्त हल्ल्यामुळे इराणच्या नेतृत्त्वाला मोठा धक्का पोहोचला आहे. मोहम्मद पकपूर हे इराणच्या इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) ग्राऊंड फोर्सचे कमांडर होते. 2025 मध्ये खामेनेई यांनी त्यांना प्रमोट केलं होतं. पकपूर हे अत्यंत कठोर आणि कट्टरपंथीय मानले जात होते, ज्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सैन्य मोहिमांची जबाबदारी सांभाळली होती. तेहरानजवळच्या एका स्ट्राइकमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

अमीर नासिरजादेह हे इराणचे माजी संरक्षण मंत्री होते. त्यांची पार्श्वभूमी हवाई दलाची होती आणि ते क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे सूत्रधार मानले जात होते. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) त्यांच्या मुख्यालयालाच लक्ष्य केलं आणि त्यात ते मारले गेले. खामेनेई यांचे सर्वोच्च सुरक्षा सल्लागार आणि सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली शामखानी यांनीही अण्वस्त्र वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेहरानजवळ झालेल्या हल्ल्यात ते त्यांच्या कुटुंबासह मारले गेले.

IRGC च्या कुद्स फोर्सचे प्रमुख इस्माइल कानी हे मध्य पूर्वेत प्रॉक्सी युद्धांचे मुख्य शिल्पकार होते. त्यांचे हिजबुल्लाह आणि हौथीसारख्या गटांशी जवळचे संबंध होते. ड्रोन हल्ल्यात कानी यांनाही लक्ष्य करण्यात आलं होतं. सशस्त्र दलांचे प्रमुख आणि धोरणात्मक नियोजन प्रमुख मोहम्मद बघेरी यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. अमेरिका-इस्रायली हल्ल्यात अयातुल्लाह खामेनेई यांचे वरिष्ठ सल्लागार अली शामखानी यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...