इराण-इस्त्रायल युद्धा दरम्यान अनोखी चोरी, इस्त्रायल हॅकर्सने 8000000000 रुपयांची क्रिप्टोकरेन्सी चोरली?

Israel Iran Conflict: नोविटेक्सने इराणला पश्चिम देशांकडून लावलेल्या निर्बंधातून मदत केली. अण्वस्त्र कार्यक्रमासाठी हा निधी वापरला जाणार होता.

इराण-इस्त्रायल युद्धा दरम्यान अनोखी चोरी, इस्त्रायल हॅकर्सने 8000000000 रुपयांची क्रिप्टोकरेन्सी चोरली?
Iran Israel War
| Updated on: Jun 21, 2025 | 2:04 PM

Iran Israel War: इराण आणि इस्त्रायल युद्ध सुरु असताना वेगळी बातमी समोर आली आहे. हे युद्ध डिजिटलच्या माध्यमातून आर्थिक नुकसानीकडे आता जाऊ लागले आहे. इस्त्रायलच्या प्रीडेटरी स्पैरो नावाच्या हॅकींग ग्रुपने इराणमधून मोठी चोरी केल्याचा दावा केला आहे. या ग्रुपने इराणचा क्रिप्टो एक्सचेंज नोबिटेक्समधून 90 दशलक्ष डॉलर्सची (जवळपास 800 कोटी रुपये) क्रिप्टोकरेन्सी चोरण्याचा दावा केला आहे. त्यांनी ही रक्कम नष्ट करुन राजकीय संदेश दिला आहे.

का केला डिजिटल हल्ला?

इस्रायलशी संबंधित हॅकर्सने इराणी क्रिप्टो एक्सचेंजवर हल्ला केला. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या वेळी हा हल्ला झाला आहे. हॅकर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्ट केली आहे. त्यामध्ये लिहिले की, दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासाठी आणि निर्बंधांचे उल्लंघन करण्यासाठी नोबिटेक्स हे एक प्रमुख साधन बनले आहे. त्यामुळे हे सायबर हल्ले करण्यात आले आहेत. हॅक झाल्यानंतर, नोबिटेक्सने त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिले की, आमची बहुतेक चलने कोल्ड व्हॅलेटमध्ये सुरक्षित आहेत. या सायबर हल्ल्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही.

क्रिप्टोकरेन्सी चोरुन केली नष्ट

क्रिप्टो एनालिटिक्स फर्म एलिप्टिकने म्हटले की, प्रीडेटरी स्पैरोने 90 दक्षलक्ष डॉलरचे बिटकॉइन, डॉगकॉइन आणि 100 पेक्षा जास्त वेगवेगळी क्रिप्टोकरेन्सी चोरली आहे. हा फंड नष्ट करण्यात आला आहे. क्रिप्टोच्या भाषेत याला ‘बर्न’ म्हटले जाते. या माध्यमातून या ग्रुपला एक राजकीय संदेश पाठवयाचा होता. ब्लॉकचेन एनालिटिक्स फर्मकडून मिळालेल्या माहितीनुसार, हॅकींगचा दावा करणाऱ्या गटाने संपूर्ण सोर्स लीक केल्याचा दावा केला आहे. त्या ग्रुपने म्हटले आहे की, नोबिटेक्सच्या वाचलेल्या एसेट्सही पूर्णपणे सार्वजनिक झाल्या आहेत.

हॅकर्सने नोविटेक्सवर आरोप केला की, नोविटेक्सने इराणला पश्चिम देशांकडून लावलेल्या निर्बंधातून मदत केली. अण्वस्त्र कार्यक्रमासाठी हा निधी वापरला जाणार होता. हॅकर्स प्रीडेटरी स्पैरो ग्रुप इस्त्रायलचा असला तरी त्याचा सरकारसोबत काहीच संबंध नाही. अधिकृतरित्या या ग्रुपने सरकारसोबतचे संबंध स्वीकारलेले नाही. प्रीडेटरी स्पैरोने हॅक केलेला फंडासाठी ‘F-iRGCTerrorists’ हे वाक्य वापरले होते. IRGC चा अर्थ इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आहे. ते इराणच्या लष्कराची एक शाखा आहे.