मोठी बातमी! होर्मुज खाडीत घडामोडींना वेग, थेट इराणकडून मोठी चेतावणी, जर जहाज…

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. कुठे ना कुठे या युद्धात अमेरिकेने माघार घेतल्याचे बघायला मिळत आहे. पाच दिवसांकरिता युद्ध थांबवण्यात आले. मात्र, अजूनही इराणकडून अमेरिकेसोबत चर्चा करण्यास नकार देण्यात आला. यादरम्यानच होर्मुज खाडीबद्दलही त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

मोठी बातमी! होर्मुज खाडीत घडामोडींना वेग, थेट इराणकडून मोठी चेतावणी, जर जहाज...
Strait of Hormuz
| Updated on: Mar 24, 2026 | 7:37 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एक अत्यंत मोठी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध पुढील पाच दिवसांकरिता थांबवले आहे. काही सकारात्मक गोष्टी घडत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुज खाडी खुली करण्याकरिता 48 तासाचा वेळ दिला होता. तो वेळ संपल्यानंतर अमेरिका मोठा हल्ला इराणवर करेल, असे सांगितले जात होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात माघार घेतल्याचे बघायला मिळतंय. सुरूवातीला डोनाल्ड ट्रम्प यांना वाटले की, या युद्धात फक्त इराण संपेल, पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. इराण अत्यंत कडक भूमिकेत या युद्धात दिसत आहे, इतके मोठे नुकसान झाले असतानाही इराण मागे हटत नाही. तिथेच डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलची मोठी हार झाली. इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, तुम्ही आमच्या रूग्णालयावर हल्ले केले आम्ही तसे नाही केले, तुम्ही आमच्या शाळांवर हल्ले केले आम्ही तसे नाही केले… पण तुम्ही जर आमच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले तर आम्हीही तेच करणार आहोत.

अमेरिकेने युद्ध थांबवण्याची घोषणा केल्यानंतर इराणने स्पष्ट शब्दात म्हटले की, अमेरिका आम्हाला घाबरली आहे. यादरम्यान आता होर्मुज खाडीत अडकलेल्या जहांजाबद्दल इराणकडन मोठे भाष्य करण्यात आले. इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, होर्मुज खाडीत अडकलेली जहाजे काढायची असतील तर एकमेव मार्ग आहे की, तुम्हाला इराणी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करावी लागेल, त्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

इराणच्या सुरक्षा परिषदेने घोषणा केली आहे की, इराणी तटबंदीला निशाणा बनून कोणत्याही प्रकारचा हल्ला सहन केला जाणार नाही आणि त्याने काहीही होणार नाही. होर्मुज खाडीतून अडकलेले जहाज काढण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करा. मुख्य समुद्रीमार्गात विविध प्रकारचे नाैसेनिक बॉम्ब सुरंगे आहेत. यासोबतच त्यांनी म्हटले की, समुद्रात जर काही घडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी आता वॉशिंग्टन आणि इस्त्रायलची असणार आहे.

जर कोणत्याही जहाजाला सुरक्षित जायचे असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे इराणसोबत चर्चा करावी. अमेरिकेने जरी हे युद्ध पाच दिवसांकरिता थांबवले असले तरीही इराणकडून अजूनही अमेरिकेसोबत चर्चा करण्यास नकार देण्यात आला. इराणकडून म्हणण्यात आले की, गेल्या 24 दिवसांपासून त्यांनी आमच्या देशात जे थैमान घातले, त्यानंतर त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करायची नाहीये.

Follow Us