
इराणमध्ये प्रचंड तणाव सध्या बघायला मिळत आहे. लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले असून या आंदोलनाला थेट अमेरिकेचे पाठबळ आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान निर्वासित युवराज रेझा पहलवी यांनी एक नवीन संदेश जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, अमेरिकेची मदत पोहोचत आहे. यासोबतच त्यांनी थेट मोठे आवाहन इराणच्या सैनिकांना केले असून लोकांची साथ द्या, तुम्ही इराणच्या लोकांच्या संरक्षणासाठी असल्याचे म्हणत त्यांनी संदेश दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करणार असल्याचे म्हटले. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणमध्ये घुसू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणच्या लोकांचा लढा शेवटच्या टप्प्यात असून लवकरच त्यांना विजय मिळले, ते विजयाच्या अत्यंत जवळ आहेत.
इराणही अमेरिकेविरोधात लढण्यास तयार आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के टॅरिफ लावणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले, यासोबतच आजपासून हा आदेश लागू असल्याचे त्यांनी म्हटले. इराणमध्ये स्थिती अधिक बिकट होताना दिसत आहे. इराणच्या आंदोलनात आतापर्यंत 2400 लोक मारले गेले आहेत. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी भडकवणारी विधान केले.
आता पहलवी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत लिहिले की, प्रिय देशवासियांनो जगाने फक्त तुमचा आवाजच नाही तर तुमची हिंमत देखील बघितली आहे.त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांचा संदेश तुम्ही नक्कीच ऐकला असेल. मदत येत आहे… ज्यापद्धतीने तुम्ही आतापर्यंत संघर्ष करत आलात तसा संघर्ष करत राहा. इतक्या लोकांना मारून रक्ताच्या नद्या वाहत आहेत.
My compatriots,
The world has not just seen and heard your voice and courage, it is now responding.
By now, you have probably heard the message from the President of the United States. Help is on the way.
Continue the fight, as you have done so far.
Do not allow this regime… https://t.co/KfotmDo0br
— Reza Pahlavi (@PahlaviReza) January 13, 2026
या दोषी लोकांचे नाव लिहून ठेवा. त्यांना शिक्षा नक्कीच मिळणार. यादरम्यान त्यांनी सैन्याला आवाहन करत म्हटले की, माझ्याजवळ सैन्यासाठी एक मोठा संदेश असून तुम्ही इराण देशाचे सैनिक आहात… इस्लामी गणराज्याची सैना नाहीत. आपल्या देशातील लोकांची रक्षा करणे हे तुमचे पहिले कर्तव्य आहे. तुमच्याकडे जास्त वेळ नाही. शक्य तितके आमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करा, असे त्यांनी थेट म्हटले.