AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेच्या तब्बल 42 लढाऊ विमानांचा खात्मा, इराणच्या युद्धात भयंकर नुकसान; थेट आकडेवारी समोर!

दुसरीकडे अमेरिकेन संसदेच्या रिपोर्टनंतर इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युद्धाच्या काळात आमचे अब्जो डॉलर्स किमतीचे नुकसान झाल्याचे अमेरिकन संसदेने मान्य केले आहे, असे अराघची म्हणाले आहेत.

अमेरिकेच्या तब्बल 42 लढाऊ विमानांचा खात्मा, इराणच्या युद्धात भयंकर नुकसान; थेट आकडेवारी समोर!
donald trump Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 20, 2026 | 7:10 PM
Share

America Iran War :मेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक जीवितहानी ही इराणमध्ये झाली आहे. अमेरिका आणि इस्त्रायल यांनी संयुक्तपणे इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी राबवले होते. या ऑपरेशनदरम्यान, दोन्ही देशांनी इराणवर विध्वंसक हल्ले केले होते. दुसरीकडे या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखाती देशात असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केलं होतं. आता याबाबतच मोठी माहिती समोर आली आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकेची मोठी हानी झाली आहे. विशेष म्हणजे हे नुकसान खुद्द अमेरिकेनेच मान्य केले आहे.

एक-दोन नव्हे तर तब्बल 42 विमानांचे नुकसान

अमेरिकन ससंसदेत नुकतेच एक रिपोर्ट सादर करण्यात आला. या रिपोर्टमध्ये इराणविरोधात चाललेल्या 40 दिवसांच्या युद्धामध्ये अमेरिकेचे काय काय नुकसान झाले, याबाबत माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार इराणने केलेल्या हल्ल्यांत अमेरिकेचे एक-दोन नव्हे तर तब्बल 42 विमानांचे नुकसान झालेले आहे. यातील काही विमाने हे पूर्णपणे नष्ट झाली आहेत तर काही विमानांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे.

युद्धात कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान

समोर आलेल्या माहितीनुसार या 42 विमानांमध्ये काही लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, पायलट नसलेली विमाने, ड्रोन यांचा समावेश आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार एप्रिलमध्ये युद्धविराम झाल्यानंतर इराणवरील हल्ले थोडे सौम्य करण्यात आले. इराणनेही नंतर आपले प्रत्युत्तरादाखल केलेले हल्ले कमी केले. या रिपोर्टनुसार या युद्धात नेमकी किती हानी झाली, याची माहिती अमेरिकन सैन्याने अद्याप दिलेली नाही. परंतु प्राथमिक माहितीनुसार अमेरिकचे या युद्धात कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झालेले आहे. तसेच इराणविरोधात लढा देण्यासाठी अमेरिकेला मोठ्या प्रमाणात खर्चही करावा लागलेला आहे.

आमच्या बलशाली सैन्याने…

दुसरीकडे अमेरिकेन संसदेच्या रिपोर्टनंतर इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युद्धाच्या काळात आमचे अब्जो डॉलर्स किमतीचे नुकसान झाल्याचे अमेरिकन संसदेने मान्य केले आहे, असे अराघची म्हणाले आहेत. आमच्या बलशाली सैन्याने सर्वात अगोदर अमेरिकेचे एफ-35 विमान पाडले. या युद्धातून आम्ही खूप काही शिकलो आहोत. पुन्हा जर युद्ध झाले तर जगाला वेगवेगळे सरप्रआईज पाहायला मिळेल, असा इशाराही इराघची यांनी दिला आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला