इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल धक्कादायक माहिती पुढे, थेट पहिल्याच दिवशी..

अमेरिका आणि इराण युद्धाने कहर केला. जगातील अनेक देशात आणीबाणी लागण्याचे संकेत आहेत. गॅस आणि कच्च्या तेलाचा पुरवठा थांबल्याने तुटवडा निर्माण झाला. यादरम्यानच आता अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे.

इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल धक्कादायक माहिती पुढे, थेट पहिल्याच दिवशी..
Mojtaba Khamenei
| Updated on: Mar 11, 2026 | 12:42 PM

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाबाबत अत्यंत मोठा खुलासा झाला. हा खुलासा इराणचे नवे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल आहे. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात इराणचे सर्वाेच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. हैराण करणारे म्हणजे युद्धाच्या पहिल्याच दिवशी आयातुल्ला अली खामेनेई यांना हल्ल्यात ठार करण्यात आले. यादरम्यान अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा जीव गेला. अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या निशाण्यावर इराणचे सर्वाेच्च नेते असल्याचे स्पष्ट झाले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला आणि हे युद्ध फार काळ चालणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. त्यानंतर इराणकडून आयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची निवड इराणचे सर्वाेच्च नेते म्हणून करण्यात आली. त्यानंतर इराण अधिक घातक बनला आणि थेट इस्त्रायलवर मोठे हल्ले करण्यात सुरूवात केली.

आता नुकताच इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अमेरिकेने 28 फेब्रुवारी रोजी केलेल्या हल्ल्यात मोजतबा खामेनेई जखमी झाले होते. त्यांच्या पायाला दुखापत झाली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर ते शुद्धीवर होते. त्यानंतर काही दिवसातच त्यांच्या खांद्यावर इराणची जबाबदारी देण्यात आली. मात्र, मोजतबा खामेनेई यांच्या दुखापतीबद्दल इतर काही माहिती मिळू शकली नाहीये.

उच्च सुरक्षा ठिकाणी मोजतबा खामेनेई यांना ठेवण्यात आले, तिथे कम्युनिकेशन फार कमी आहे. याबद्दल तीन इराणी उच्च अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर थेटपणे सांगितले की, मोजतबा खामेनेई यांच्या पायाला दुखापत झाली. ज्यावेळी ही दुखापत झाली, त्यावेळी ते शुद्धीवर होते. 28 फेब्रुवारीच्याच हल्ल्यात त्यांना ही दुखापत झाली.

सुरूवातीला इराणच्या सर्वाेच्च नेतेपदाकरिता मोजतबा खामेनेई यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मोजतबा खामेनेई यांच्या नावाची घोषणा सर्वाेच्च नेतेपदासाठी करण्यात आल्यानंतर इराण अधिक घातक बनल्याचे बघायला मिळतंय. जोरदार हल्ले इराणकडून सुरू करण्यात आली. इस्त्रायलचे प्रमुख शहरे इराणच्या निशाण्यावर आहेत. आखाती देशांमधील रडार स्टिटमवर इराणकडून अगोदरच मोठे हल्ले करण्यात आली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us