AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध विरामाची घोषणा होताच डोनाल्ड ट्रम्प संकटात… आपल्याच देशात… मोठ्या घडामोडींकडे जगाचे लक्ष

अमेरिका आणि इराणमधील 40 दिवसांच्या युद्धानंतर अखेर तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा झाली आहे. या युद्धामुळे मोठी जीवितहानी, आर्थिक नुकसान आणि ऊर्जा संकट निर्माण झाले होते. या युद्धविरामाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा 'विजय' म्हणून गौरवले जात असले, तरी त्यांच्यावर देशांतर्गत टीकेची झोड उठली असून राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

युद्ध विरामाची घोषणा होताच डोनाल्ड ट्रम्प संकटात... आपल्याच देशात... मोठ्या घडामोडींकडे जगाचे लक्ष
| Updated on: Apr 08, 2026 | 10:50 AM
Share

28 फेब्रुवारी रोजी इस्रायलसोबत मिळून अमेरिकेने इराणवर हल्ला चढवल्याने युद्धाला तोंड फुटलं. जवळपास 40 दिवस सुरू असलेल्या या युद्धात अगणित नुकसान, मोठी जीवितहानी तर झालीच पण उर्जा संकटमुळे इतर देशांनाही या युद्धाचा भुर्दंड सहन करावा लागला. महिन्याभरापेक्षा अधिक कालावधीनंतर अखेर काल इराण आणि अमेरिकेने युद्धविरामाची घोषणा केली असून पुढले दोन आठवडे एकमेकांवर हल्ले केले जाणारा नाहीत असंही जारी केलंय. हा तात्पुरता युद्धविराम आहे की युद्ध पूर्णपणे थांबेल, हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र यादरम्यान ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला अनेक इशारे देत आक्रमक भूमिका घेतली होती, त्यांचं हे पाऊल देशातील अनेकांना पटलं नव्हतं, मोठ्या प्रमाणात जनतेचा या युद्धालाा विरोध होताच, अनेक लोकं त्याविरोधात रस्त्यावरही उतरल्याचं दिसून आलं होतं.

एकीकडे ट्र्म्प यांनी 40 दिवसांपासून सुर असलेली सैन्याची कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. इस्रायलनेही इराणवरील हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली असून, पुढील चर्चा पाकिस्तानात होणार आहे. ट्रम्प यांची ही घोषणा युद्ध संपवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून पाहिली जात आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या संदेशाने शांततेची आशा निर्माण झाल्याने जगभरातील बाजारपेठांमध्ये तेजी आली आहे. मात्र असं असलं तरी या युद्धविरामानंतर अमेरिकेत ट्रम्प यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर चढत आहे. अमेरिकेचे सिनेटर ख्रिस मर्फी यांनी इराणविरुद्धच्या युद्धाच्या या समाप्तीचे वर्णन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संपूर्ण शरणागती असं केलं होतं. यामुळे इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळालं आहे, असं त्यांनी सीएनएनवर बोलताना सांगितलं.

ट्रम्प यांच्यावर टीका

ते (ट्रम्प) सत्य सांगत नाहीत , असा दावा अमेरिकी सिनेटरने केला आहे. इराणच्या मागण्यांपैकी काही भाग जरी मान्य झाला, तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण देण्यास सहमती दर्शवली आहे. जगासाठी एक विनाशकारी परिस्थिती असल्याचं ख्रिस मर्फी म्हणाले. तर दुसरीकडे अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्य सदस्य ग्वेन मूर यांनीही युद्धविरामानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर टीका केली. ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी अयोग्य घोषित करून, काँग्रेसने त्यांच्यावर महाभियोग चालवावा अशी मागणी त्यांनी केली. काहीही करून डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटवले पाहिजे, असं ग्वेन मूर यांनी म्हटलं. त्यांची (ट्रम्प) वेडगळ धोरणं संपवण्यासाठी रिपब्लिकन खासदारांनी डेमोक्रॅट्ससोबत एकत्र येण्याची वेळ आल्यांचही त्या म्हणाल्या.

जर हा युद्धविराम यशस्वी व्हायला हवा असेल तर इस्रायलनेही संयम बाळगणे आवश्यक असल्याचं अमेरिकेचे माजी दहशतवादविरोधी प्रमुख जो केंट यांनी म्हटलं. ” इस्रायल नियंत्रणात राहील याची आपण सर्वात पहिले काळजी घेतली पाहिजे,” असं ते म्हणाले.

एकीकडे अमेरिकेत ट्रम्प यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना, व्हाईट हाऊसने मात्र हा ( युद्धविराम) अमेरिकेचा एक मोठा विजय असल्याचे म्हणत गौरवलं आहे. “हा अमेरिकेचा विजय आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि आपल्या उत्कृष्ट लष्करामुळे हे शक्य झाले” असं व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट म्हणाल्या. ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’च्या अगदी सुरुवातीपासूनच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ही मोहीम चार ते सहा आठवडे चालेल अशी अपेक्षा होती, असा दावा त्यांनी केला. अमेरिकी सैनिकांच्या असाधारण क्षमतेमुळे, लष्करी उद्दिष्ट केवळ 38 दिवसांत साध्य झाले आणि त्याहूनही अधिक कामगिरी झाली असंही लेव्हिट यांनी म्हणत ट्रम्प यांचं गुणगान गायलं.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त