AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा खात्मा करण्यासाठी अणुबॉम्ब वापरणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय? व्हाईट हाऊसने सांगितला प्लॅन

US vs Iran : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची सभ्यता संपवण्याचा इशारा दिला आहे. यासाठी अमेरिका अणुबॉम्ब वापरणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता व्हाईट हाऊसने भाष्य केले आहे.

इराणचा खात्मा करण्यासाठी अणुबॉम्ब वापरणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय? व्हाईट हाऊसने सांगितला प्लॅन
DJ Trump and Iran WarImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 07, 2026 | 10:47 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची सभ्यता संपवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी ‘एक संपूर्ण सभ्यता आज रात्री नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही. मला असे व्हावे असे वाटत नाही, पण कदाचित तसे होईल. आज रात्री आपल्याला कळेल, जे जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक असेल.’ असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता अमेरिका आता इराणवर अणुबॉम्ब टाकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता व्हाइट हाऊसने भाष्य केले आहे.

ट्रम्प इराणवर अणुबॉम्ब टाकणार?

डोनाल्ड ट्रम्प इराणवर अणुबॉम्ब टाकणार असल्याची चर्चा असताना आता अमेरिकेने स्पष्ट केले आहे की ते इराणवर अणुबॉम्ब हल्ला करणार नाहीत. व्हाईट हाऊसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले की, ‘आम्ही इराणवर अणुहल्ला करण्याचा कोणताही विचार करत नाही.’ अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स यांनी यापूर्वी म्हटले होते की अमेरिकेकडे अजून अनेक प्रकारची शस्त्रे आहेत, ज्यांचा वापर अद्याप केलेला नाही. त्यांच्या या विधानानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप इराणवर अणुहल्ला करू शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

इराणला गंभीर इशारा

डोनाल्ड ट्रंप यांनी इराणवर भीषण हल्ला करण्याबाबत भाष्य केले आहे. दोन्ही देशांमधील शांतता चर्चेच्या मुदतीची वेळ जवळ येत असताना, इराण चर्चेसाठी तयार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेची पुढची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा देत म्हटले होते की, ‘जर मंगळवार रात्री 8 वाजेपर्यंत (ET) समाधानकारक करार झाला नाही, तर इराणची संपूर्ण सभ्यता आज रात्रीच नष्ट होऊ शकते.’ या इशाऱ्यामुळे अणुहल्ल्याच्या शक्यतांबाबतही चर्चा रंगल्या होत्या, मात्र आता याला पूर्ण विराम मिळाला आहे.

अणुहल्ला पर्याय नाही

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स यांच्या वक्तव्यानंतर अणु हल्ल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र आता व्हाईट हाऊसने स्पष्टीकरण देत अण्वस्त्रांच्या वापराला स्पष्ट नकार दिला. त्यांनी ठामपणे सांगितले की वॅन्स यांच्या वक्तव्याचा अर्थ अणु पर्याय असा नाही. त्यामुळे इराणवरील मोठे संकट आता टळले आहे.

Follow Us
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...