AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरण या अन्यथा तुम्हाला थेट… डोनाल्ड ट्रम्प यांनाच धमकी; अमेरिकेत मोठी खळबळ; इराणचा भयंकर…

Iran vs USA : इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांचे सल्लागार महदी मोहम्मदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना कडक इशारा दिला आहे. इराणने अमेरिकेला अश्मयुगात पाठवण्याची भाषा केली आहे.

शरण या अन्यथा तुम्हाला थेट... डोनाल्ड ट्रम्प यांनाच धमकी; अमेरिकेत मोठी खळबळ; इराणचा भयंकर...
Trump iranImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 07, 2026 | 3:14 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडालेली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या दिल्या जात आहेत. एकमेकांचा खात्मा करण्याची भाषा केली जात आहे. अशातच आता इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांचे सल्लागार महदी मोहम्मदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, ट्रंप यांच्याकडे माघार घेण्यासाठी 20 तासांचा वेळ आहे, अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.’ डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नष्ट करण्याची धमकी दिली असताना इराणकडून हा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

इराणची अमेरिकेला धमकी

मोहम्मद बाकर गालिबाफ यांचे सल्लागार महदी मोहम्मदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, ‘आम्ही मागे हटणार नाही. आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना शरण येण्यासाठी 20 तासांचा वेळ देत आहोत. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाषाणयुगात पाठवले जाईल.’ मोहम्मदी यांनी असाही दावा केला आहे की, इराणने हे युद्ध जिंकले आहे आणि आता आम्ही फक्त असा करार स्वीकारेल, जो विजयाला अधिक बळकट करेल आणि प्रदेशात नवीन सुरक्षा व्यवस्था निर्माण करेल.

दोन्ही देशांचा एकमेकांना इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुज सामुद्रधुनी उघडण्यासाठी अमेरिकन वेळेनुसार आज रात्री 8 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. जर इराणने सामुद्रधुनी खुली न केल्यास भीषण हल्ल्याचा इशारा दिला आहे. यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) ने अमेरिकेच्या धमक्यांना फेटाळून लावले असून IRGC चे प्रवक्ते इब्राहिम जुल्फिकारी यांनी ट्रम्प यांची वक्तव्ये निराधार आहेत आणि या धमकीचा कोणताही परिणाम होणार नाही असं म्हटलं आहे.

अमेरिकेच्या धमक्यांमुळे कारवाया थांबणार नाहीत

इराणी सैन्याने अमेरिकेची भूमिका दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले आहे, तसेच अशा धमक्यांमुळे आमच्या कारवाया थांबणार नाहीत, असेही स्पष्ट केले आहे. आणखी एका निवेदनात इराणने म्हटले की, ट्रम्प यांचे इशारे अमेरिकेचे अपयश आणि अपमान लपवू शकत नाहीत. त्यामुळे आता 20 तासांनंतर इराण नेमका कसा हल्ला करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Follow Us
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....