मोठी बातमी! इराणकडून ट्रम्प यांना हादरवणारी घोषणा, अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जगभरात खळबळ

अण्वस्त्र कार्यक्रमावरून इराणने घेतलेल्या भूमिकेनंतर काही महिन्यांपूर्वी इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध झालं होतं. त्यानंतर आता इराणकडून मोठी घोषणा करण्यात आली असून, मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! इराणकडून ट्रम्प यांना हादरवणारी घोषणा, अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जगभरात खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2025 | 3:03 PM

अण्वस्त्र कार्यक्रमावरून इराणने घेतलेल्या भूमिकेनंतर काही महिन्यांपूर्वी इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध झालं होतं. याच दरम्यान अमेरिकेकडून इराणच्या दोन महत्त्वाच्या अणु केंद्रांवर मिसाईल हल्ला करण्यात आला होता. यामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर अखेर अमेरिकेच्याच मध्यस्थीने इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. मात्र त्यानंतर आता इराणने मोठा निर्णय घेतला आहे, इराणच्या या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली असून, अमेरिका आणि इस्रायलसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

इराणने आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत मोठी घोषणा केली आहे, मोठा निर्णय घेतला आहे. अणु कार्यक्रमावर संयुक्त राष्ट्र संघाकडून (UN) जी बंधन घालण्यात आली आहेत, त्या बंधनांना आम्ही यापुढे बांधील नसणार अशी घोषणा शनिवारी इराणकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव 2231 ची मुदत संपल्यानंतर लगेचच इराणकडून ही घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा मध्यपूर्वेत तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, अमेरिका आणि इस्रायलचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

2015 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाकडून एक ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावांतर्गत एक अणु करार मंजूर करण्यात आला होता, ज्याची मुदत ही 18 ऑक्टोबर 2025 रोजी संपली आहे. या अणु करारांतर्गत इराणच्या आणु कार्यक्रमावर काही बंधन घालण्यात आली होती, मात्र या कराराची मुदत संपताच आता इराणने मोठी घोषणा केली आहे, हा करार त्याच्या वेळेत संपला आहे, त्यामुळे आता आमच्यावर कोणंतही बंधन नसणार आहे, अणु कार्यक्रमावर संयुक्त राष्ट्र संघाकडून (UN) जी बंधन घालण्यात आली आहेत, त्या बंधनांना आम्ही आता यापुढे बांधील नसणार आहोत, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, दरम्यान यावर आता अमेरिका काय भूमिका घेणार? इस्त्रायल काय प्रतिक्रिया देणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. इराणने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता पुन्हा एकदा मध्यपूर्वेत तणाव वाढण्याची शक्यता आहे.