ट्रम्प यांचा पराभव होताच गेम पलटला, इराणचा खतरनाक अल्टिमेटम, नाही तर… जगाला हादरवणारी धमकी

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांच्या पक्षाच्या पराभवानंतर इराणने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला 48 तासांचा अल्टिमेटम दिला असून, हल्ले थांबवल्यास होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची अट ठेवली आहे. अन्यथा, इराणकडून मोठ्या लष्करी कारवाईची धमकी देण्यात आली आहे.

ट्रम्प यांचा पराभव होताच गेम पलटला, इराणचा खतरनाक अल्टिमेटम, नाही तर... जगाला हादरवणारी धमकी
abbas araghchi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 10:20 AM

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. ट्रम्प यांचा पराभव होताच इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला दोन दिवसाचा प्रस्ताव दिला आहे. अमेरिकेने चोहोबाजूने सुरू केलेले हल्ले 48 तासात बंद केले तर आम्ही होर्मुज स्ट्रेट उघडू. जर अमेरिकेने दोन दिवसात हल्ले थांबवले नाही तर इराणी सैन्य अमेरिकेवर तुफान हल्ला करेल, असा इशाराच अब्बास अराघची यांनी दिला आहे.

अब्बास अराघची यांनी रविवारी इराणचा सरकारी मीडिया IRNAला मुलाखत दिली. त्यानंतर त्यांनी एक्सवर पोस्ट करून हा इशारा दिला आहे. अमेरिकन मतदारांनी आपला निर्णय दिला आहे. आता व्हाइट व्हाऊसलाही निर्णय घ्यायचा आहे. आमचा दोन दिवसाचा प्रस्ताव अर्थात अल्टिमेटम अजून कायम आहे. सर्व बाजूने होणारे हल्ले बंद करण्यासह आमच्या इतर अटी मान्य करा. त्यानंतरचे परिणाम पाहा. नाही तर युद्धाचा मार्ग अवलंबा आणि आमच्या सैनिकांचा सामना करा, असं थेट आव्हानच अराघची यांनी दिलं आहे.

Loading...

म्हणून संवाद थांबला

अमेरिकेच्या मिडटर्म निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही देशातील शांती वार्ता थांबली आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यस्थ देशांचे आवाजही अचानक बंद झाले आहेत. निवडणुकीच्या निकालामुळे अमेरिकेत हालचाली सुरू झाल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

अराघची यांच्या मते, अमेरिका कूटनीतीचा मार्ग अवलंबेल की सैन्य कारवाई करेल हे पाहावे लागेल. आम्ही युद्धाच्या कोणत्याही शक्यतेसाठी तयार आहोत. आमच्या सैन्याने शस्त्र अधिक परजून ठेवली आहेत. आम्ही आमच्या त्रुटी दूर केल्या आहेत. आमच्या नव्या शस्त्रांचं परीक्षणही केलं आहे, असं अराघची यांनी स्पष्ट केलं.

इराणच्या मागण्या मान्य नाही

अराघची यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी फ्लोरिडा येथे प्रतिक्रिया दिली. इराणच्या मागण्या स्विकारल्या जाणार नाहीत. अनेक देश आमच्या दोघांमध्ये संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सध्या तरी कोणतीही तडजोड होईल असं वाटत नाही. राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प यांना कूटनीतीने हा वाद सोडवायचा आहे. पण इराणच्या काही मागण्या व्यवहारीक नाहीत. त्या हस्यास्पद आहेत, असं मार्को रुबियो म्हणाले.

ट्रम्पही बेधड बोलले

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनीही सीएनएनला प्रतिक्रिया दिली आहे. इराणला दुसऱ्यांदा हल्ला करण्याची गरज पडणार नाही. इराण एका मजबूत करारावर सही करतो की नाही, यावर सर्व काही अवलंबून आहे, असं सूचक विधान ट्रम्प यांनी केलं आहे. इराण हा कमकुवत देश आहे. तिथे 301 टक्के महागाई वाढली आहे. अमेरिकन सैन्याने इराणला मोठं आर्थिक नुकसान पोहोचवलं आहे. त्यामुळे गरज पडल्यास आम्ही इराणला पूर्णपणे नेस्तनाबूत करू, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us