AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai AQI : मुंबईत दिवाळीच्या फटाक्यांमुळे AQI वाढला, ध्वनी प्रदूषण झालं, पण त्याचवेळी दुसरीही सकारात्मक बाजू आली समोर

Mumbai AQI: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले गेले यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे शिवाय ध्वनी प्रदूषण झालं. पण याशिवाय अजून एक सकारात्मक बाजू समोर आली आहे.

Mumbai AQI : मुंबईत दिवाळीच्या फटाक्यांमुळे AQI वाढला, ध्वनी प्रदूषण झालं, पण त्याचवेळी दुसरीही सकारात्मक बाजू आली समोर
Mumbai AQI
| Updated on: Nov 09, 2026 | 10:11 AM
Share

८ नोव्हेंबर रोजी दिवाळी आणि लक्ष्मी पूजन निमित्ताने लोकांनी फटाक्याची आतिषबाजी केली. यामुळे सगळीकडे धूर आणि खराब हवा झाली होती. यामुळे प्रचंड वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण झाले. अनेकांनाच्या आरोग्यावर यामुळे परिणाम झाला. पंरतु, दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणात गेल्या दोन दशकांत लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षण समोर आले आहे. २००६ मध्ये दिवाळीदरम्यान फटाक्यांच्या आवाजाची कमाल पातळी १४४.९ डेसिबल इतकी नोंदवण्यात आली होती. २०२६ मध्ये हीच पातळी ९३.१ डेसिबलवर आली आहे. ग्रीन फटाक्यांची वाढती मागणी, फुलबाज्या आणि भुईचक्रांसारख्या कमी आवाजाच्या फटाक्यांची लोकप्रियता यामुळे आवाजाची तीव्रता कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

फटाक्यांच्या आवाजावर काही प्रमाणात नियंत्रण

याशिवाय, न्यायालयीन कारवाई, ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी आणि विविध जनजागृती मोहिमांमुळे फटाक्यांच्या आवाजावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे पर्यावरण कार्यकर्त्यांचे मत आहे. मात्र, आवाजाची पातळी कमी झाली असली तरी निवासी भागांमध्ये ध्वनिप्रदूषण अद्यापही निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नियमांची अधिक कठोर अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

हवेच्या गुणवत्तेतही सुमारे ३० टक्क्यांनी सुधारणा

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईच्या दिवाळीतील हवेच्या गुणवत्तेतही सुमारे ३० टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. २०२५ मध्ये मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १८८ म्हणजेच खराब श्रेणीत होता. तर २०२६ मध्ये तो १३२ वर आला असून मध्यम श्रेणीत नोंदवण्यात आला आहे. मात्र, दिवाळीच्या रात्री फटाक्यांच्या आतषबाजीमुळे अनेक भागांतील हवेची गुणवत्ता अचानक खालावल्याचे दिसून आले. अंधेरी येथे रात्री ८ वाजता P 2.5 ची पातळी ४२ होती. मात्र अवघ्या दोन तासांत ती वाढून ५९७ वर पोहोचली. मालाडमध्ये 2.5 ची पातळी ६०६ पर्यंत नोंदवण्यात आली, तर चेंबूरमध्ये रात्री १० वाजता पातळी ४८० वर गेली.

एकूणच, मुंबईत दिवाळीदरम्यान हवेच्या गुणवत्तेत सरासरी सुधारणा झाली असली तरी रात्रीच्या वेळी फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीसोबतच नियमांची प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

Follow Us
दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल...
Western Railway : दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल यंत्रणा ठप्प; लोकल 15 ते 30 मिनिटे उशिराने
CM फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! अंधारे असं का म्हणाल्या?
Sushma Andhare On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या....
Nashik : त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता....
Jejuri Khandoba Yatra : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता शाही स्नानासाठी पालखी रवाना, पाहा भक्तिमय सोहळा
गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज..
Gokul : गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज मोर्चा, धनंजय महाडिक म्हणाले...
जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक
Shivsena : जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंठा-परतूरमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नेमकं कारण काय?
भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान...
Rohit Pawar : भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान, एकनाथ शिंदेंनाही दिला सूचक इशारा
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक