AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुझमध्ये दोन महाकाय जहाजांसोबत भयंकर घडलं, क्षणात घेतला…इस्लामाबाद बैठकीनंतर पुन्हा युद्धाचे काळे ढग!

पाकिस्तानमधील इराण आणि अमेरिका यांच्यातील बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीच्या अपयशामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे होणारी व्यापार वाहतूक आता संकटात सापडली आहे. असे असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे.

होर्मुझमध्ये दोन महाकाय जहाजांसोबत भयंकर घडलं, क्षणात घेतला...इस्लामाबाद बैठकीनंतर पुन्हा युद्धाचे काळे ढग!
strait of hormuzImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2026 | 10:09 PM
Share

Strait Of Hormuz : अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये बैठक झाली. या बैठकीत युद्ध कायमचे संपवण्यावर चर्चा झाली. दोन्ही देशांनी एकमेकांपुढे आपापल्या अटी ठेवल्या. परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. कोणत्याही ठोस निर्णयाविनाच ही बैठक पार पडली. त्यामुळे युद्ध पुन्हा सुरू होणार का? असा भीती वाढवणारा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे युद्ध भडकण्याची शंका खरी ठरते की काय, असे वाटावे अशी एक घटना समोर आली आहे. ही घटना इराणचे वर्चस्व असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत घडली असून यामुळे संपूर्ण जगात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी जगाला चकित करणारा एक प्रकार समोर आला आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांत 14 दिवसांची शस्त्रसंधी झालेली आहे. तरीदेखील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दोन मोठ्या तेलवाहू जहाजांना यू टर्न घ्यावा लागला आहे. शिप ट्रॅकिंग डेटाच्या माहितीनुसार दोन मोठे रिकामे तेलवाहू जहाजे ओमानच्या आखातातून होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जात होते. ही सर्व जहाजे पर्शियनच्या आखातात प्रवेश करणार होते. या सर्व जहाजांना इराणकडून प्रवेशास परवानगी मिळाली होती. परंतु लारक बेटाजवळ पोहोचताच सगळं बदलून गेलं.

ऐनवेळी जहाजांनी घेतला यू टर्न

या दोन्ही जहाजांना ऐनवेळी यू टर्न घेऊन परतावं लागलं आहे. यातील एका जहाजाचे नाव एगियोस फानुरियोस-1 असे आहे. तर दुसरे जहाज हे पाकिस्तानचे असून त्याचे नाव शालीमार असे आहे. या दोन्ही जहाजांनी ऐनवेळी रस्ता बदलून यू टर्न घेतला. एगियोस फानुरियोस-1 हे जहाज इराकचे आहे.

जहाजे माघारी फिरण्याचे कारण काय?

दरम्यान, या जहाजांनी लगेच यू टर्न का घेतला याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु अमेरिका आणि इराण यांच्यातील इस्लामाबादची बैठक अयशस्वी झाल्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या व्यापारावर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. याच कारणामुळे ही दोन्ही जहाजे परत फिरली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल