AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा इराणसोबत ‘डबल गेम’ तर नाही ना ? सौदीत अरबमधल्या कृतीने संशयाला बळ

पाकिस्तानने सौदी अरबमध्ये आपले सैन्य तैनात करत संरक्षण सहकार्य वाढवले आहे. तर दुसरीकडे इराणसोबत शांततेची बोलणी जारी आहेत. या पावलाने पाकिस्तान डबलगेम तर खेळत तर नाही ना असा सवाल केला जात आहे.

पाकिस्तानचा इराणसोबत 'डबल गेम' तर नाही ना ? सौदीत अरबमधल्या कृतीने संशयाला बळ
Military deployment
| Updated on: Apr 11, 2026 | 5:09 PM
Share

पाकिस्तान आणि सौदी अरब यांच्यात संरक्षण सहकार्य मजबूत करत असताना आता पाकिस्तानने त्यांच्या सैन्य दलांना सौदी अरबमध्ये तैनात केले आहे. सौदी संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सैन्य दल आणि सहायक विमानांसह पाकिस्तानी आर्मीचे जवान शनिवारी किंग अब्दुलअजीज एअर बेसला पोहचले आहेत. हा तोच एअरबेस आहे ज्यावर इराणसोबतच्या युद्धात अनेक वेळा ड्रोन आणि मिसाईल हल्ले झाले होते. सध्या इराणचे एक शिष्ठमंडळ अमेरिकन प्रतिनिधी मंडळासोबत सीजफायरवर चर्चा करण्यासाठी इस्लामाबादला पोहचले असताना पाकिस्तानने सौदीत आपली आर्मी तैनात केल्याने पाकिस्तान इराण सोबत डबल गेम तर खेळत नाही ना असा सवाल केला जात आहे.

सप्टेंबरात दोन्ही देशात करार

या सैन्य तैनाती मागे दोन्ही देशात समन्वय वाढवणे आणि क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षा आणि स्थिरतेला मजबूत करणे आहे असे सौदी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. सप्टेंबर महिन्यात दोन्ही देशात एक संरक्षण करार करण्यात आला होता. त्यानुसार कोणाही एका देशावर हल्ला झाला तर तो हल्ला दोन्ही देशांवरचा मानला जाईल. इराणने अमेरिका आणि इस्रायल सोबत सुरु असलेल्या युद्धादरम्यान सौदी अरब देखील हल्ले केले होते, त्यात सौदी अरबला मोठे नुकसान झाले होते. आता एकीकडे शांततेसाठी बैठका घेत असताना दुसरीकडे पाकिस्तानने सौदीत सैन्य तैनात केल्याने अनेक लोकांना पाकिस्तानची वागण्यावर संशय व्यक्त होत आहे.

इराण आणि अमेरिकन वादात अनेक देश मध्यस्थ

इस्लामाबाद येथे इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान सुरु असलेल्या महत्वाच्या शांतता बैठकीत चर्चेला सुरुवात झाली आहे. येथील सूत्रांच्या माहितीनुसार इजिप्त, सौदी अरब, चीन आणि कतारचे अधिकारी देखील पाकिस्तानातील या बैठकीला उपस्थित आहेत. आणि या चर्चेत मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. इराणच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व संसद अध्यक्ष मोहम्मद बागैर गालिबफ करीत आहेत. शनिवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट मोहम्मद बागैर गालिबफ यांनी घेतली आहे. या बैठकीबद्दल इराणी पक्षाने किंवा पंतप्रधान कार्यालय दोन्हीही अधिकृत टिपण्णी केलेली नाही.

Follow Us
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी