
इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही शक्तीशाली देशांनी इराणवर भीषण हल्ला केला आहे. इस्त्रायलने इराणच्या राष्ट्रपती भवनाला लक्ष्य केले आहे. याशिवाय इराणी गुप्तचर एजन्सीच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार इराणी सरकारच्या अनेक महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य करण्यात आले आहे. सध्या इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई तेहरानमध्ये नाहीत. त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे. इस्त्रायलने इराणच्या जवळपास 30 महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे.
इस्त्रायलने इराणवर अनेक क्षेपणास्त्रे डागली आहेत. हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक ठिकाणी इमारतींमधून धुराचे लोट निघताना दिसत आहेत. इस्त्रायलने या ऑपरेशनचे नाव ‘शील्ड ऑफ जूडा’ म्हणजे यहुदीची ढाल ठेवले आहे. इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर इराकमध्येही अलर्ट घोषित करण्यात आला आहे आणि त्याने आपले एअरस्पेस बंद केले आहे.
Let the world know that we did not start this war pic.twitter.com/9G3vbJYw1D
— Iran Military Monitor (@IRIran_Military) February 28, 2026
कोणत्या कोणत्या शहरांवर झाला हल्ला?
-तेहरान
-कॉम
-तबरेज
-करमनशाह
-कराज
-इस्फहान
इराणमधून अनेक असे व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात स्फोट झाल्याचे दिसत आहे. लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण दिसत आहे. इराणी मीडियाने सांगितले आहे की, इस्त्रायल सेनेने इराणी सेना IRGCच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. याशिवाय मध्य तेहरानलाही लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच जोम्हौरी आणि त्याच्या आसपासच्या भागांवरही मिसाइल डागण्यात आल्या आहेत. इराणचे सर्वात मोठे धार्मिक शहर कुमवरही हल्ला करण्यात आला आहे. इस्फहान, करमनशाह, तबरीज आणि करजवर हल्ले झाले आहेत. याशिवाय इराणी अणु केंद्र आणि खामनेई यांच्या कार्यालयालाही लक्ष्य करण्यात आले आहे.
The sound of three explosions in central Tehran pic.twitter.com/LrxS3t9r0X
— Iran Military Monitor (@IRIran_Military) February 28, 2026
मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या सुमारे ३० शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच इराणच्या इंटेलिजेंस ब्यूरो आणि गृह मंत्रालयावरही हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिकी मीडिया रिपोर्टनुसार, ट्रंप यांनी म्हटले आहे की, इराणवर पुढील चार दिवसांपर्यंत हल्ले सुरू राहतील.
बॅलिस्टिक मिसाइल प्रकल्प सर्वात मोठा वाद
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणवर हल्ल्याची धमकी दिली होती. अमेरिकेच्या सेनेने इराणला चारही बाजूंनी वेढले आहे. यापूर्वी शुक्रवारी अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ इस्त्रायल सोडण्यास सांगितले होते. इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या अणु डिलच्या चर्चेत बॅलिस्टिक मिसाइल प्रकल्प सर्वात मोठा वादाचा मुद्दा बनला आहे. इराण यावर अजिबात करार करण्यास तयार नाही आणि याला आपली रेड लाइन मानतो.