
इस्रायलने ईराणवर मोठा हल्ला केला आहे. ही माहिती स्वतः इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. IDFने लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर तेथे सायरन वाजू लागले आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायलवरही प्रत्युत्तर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे इस्रायलने लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. इस्रायलने विशेष आणीबाणीची घोषणा केली आहे. इस्रायलमधील शाळांना सुट्टी घोषीत करण्यात आली आहे.
इस्त्रायलने केलेल्या या हल्ल्यानंतर इराणचे एअरस्पेस पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. हल्लानंतर जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत आहे. इराणमध्ये लोकांना वाचवण्यासाठी फक्त अॅम्ब्युलन्सच रस्त्यावर दिसत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
इराणवर हल्ल्यानंतर इस्रायलचे निवेदन समोर आले आहे. इस्रायलने म्हटले आहे की, आम्ही हल्ला केला नसता तर ईराण आमच्यावर हल्ला करून टाकला असता. हल्ल्यांच्या स्फोटांचा आवाज ऐकून इराणमधील प्रवासी बंकरमध्ये गेले आहेत. इराणमध्ये झालेल्या स्फोटांवर डीएम कॅट्झ यांनी म्हटले की, हल्ल्यांचा उद्देश ‘इस्रायलसाठी असलेला धोका दूर करणे’ आहे. तसेच इस्त्रायलने देशात आणीबाणी घोषित करुन शाळांना सुट्टी दिली आहे.
IDF होमफ्रंट कमांडनुसार, आवश्यक क्षेत्र वगळता सर्व शैक्षणिक ठिकाणे, एकत्र येणे आणि कामावर बंदी घालण्यात आली आहे. हा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेचे संयुक्त ऑपरेशन आहे. या हल्ल्यात इराणच्या राष्ट्रपती भवनालाही लक्ष्य करण्यात आले आहे. सध्या इरबिल एअरपोर्ट बंद करण्यात आले आहे. इराणी गुप्तचर मंत्रालयावर हल्ला करण्यात आला. इराणच्या अणु केंद्रांवरही बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत. या ऑपरेशनचे नाव ‘शील्ड ऑफ जूडा’ आहे.
‘इराणला चांगल्या दिवसांकडे परत आणण्यास मदत करा’
जसे इस्त्रायलने इराणवर हल्ला केला, तसेच मोसाद गुप्तचर एजन्सीने आपल्या अधिकृत फारसी भाषेच्या टेलीग्राम चॅनेलवर इराण लोकांना इराणला त्याच्या चांगल्या दिवसांकडे परत आणण्यात मदत करण्याची विनंती केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आमच्या इराणी भावंडांनो आणि बहिणींनो, तुम्ही एकटे नाही! आम्ही विशेषतः तुमच्यासाठी एक अतिशय सुरक्षित आणि खास टेलीग्राम चॅनेल लॉन्च केले आहे. आपण सर्व मिळून इराणला त्याच्या चांगल्या दिवसांकडे परत आणू.