AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Hamas War | म्युझिक फेस्टिव्हलमध्ये एकाचवेळी 250 लोक कसे मारले गेले? धक्कादायक सत्य समोर

Israel Hamas War | लोकांना आपला जीव का वाचवता आला नाही?. तिथे काय परिस्थिती होती. एक व्हिडिओमध्ये इस्रायली महिला आणि तिच्या प्रियकराची ओळख पटवण्यात आली आहे.

Israel Hamas War | म्युझिक फेस्टिव्हलमध्ये एकाचवेळी 250 लोक कसे मारले गेले? धक्कादायक सत्य समोर
Israel Hamas War How 250 dead in desert music festival
| Updated on: Oct 10, 2023 | 9:18 AM
Share

जेरुसलेम : हमासच्या भीषण हल्ल्यात आतापर्यंत 900 इस्र्यायलींचा मृत्यू झालाय. यात नागरिकांसह सैनिक आहेत. शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून हैदोस घातला. वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. पण एकाच ठिकाणी 250 नागरिकांचा मृत्यू होण्याची दुर्देवी घटना इस्रायलमध्ये घडली आहे. इस्रायलच्या नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये ही दुर्देवी घटना घडली. संपूर्ण रात्रभर इथे डान्स पार्टी चालणार होती. पण हमासच्या हल्ल्यामुळे सगळ काही बदलून गेलं. आनंदाची जागा दु:खाने घेतली. हमासने या म्युझिक फेस्टीव्हलमध्ये घुसून अनेकांना बंधक बनवलं. त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतायत. “एका मोकळ्या जागेत पार्टी सुरु होती. आम्हाला लपण्यासाठी कुठे जागाच नव्हती. हमासचे दहशतवादी घुसल्यानंतर एकच पळापळ सुरु झाली” असं या फेस्टीव्हलला उपस्थित असलेल्या ताल गिबलीने सांगितलं. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी तो बोलत होता.

म्युझिक फेस्टीव्हलपासून दोन किमी अंतरावरच हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली सैनिक आणि रणगाड्यांवर हल्ले सुरु केले होते. व्हिडिओमध्ये अनेक जण आपल्या कारमधून तसेच धावत मोकळ्या शेतात पळताना दिसत होते. त्यांच्या पाठिमागे गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. गाझा पट्टीजवळ हा म्युझिक फेस्टीव्हल सुरु होता. हमासने बंधक बनवल्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेत. एक व्हिडिओमध्ये इस्रायली महिला आणि तिच्या प्रियकराची ओळख पटवण्यात आली आहे. आरगामनी असं या महिलेच नाव आहे. आरगामनी मोटरसाय़कलवर असून ती मदतीसाठी याचना करताना दिसतेय. पॅलेस्टाइनमध्ये किती लोकांचा मृत्यू?

इस्रायलने आता या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. नागरिक आणि सैनिक मिळून 150 जणांना हमासने बंधक बनवल्याची माहिती आहे. या भीषण युद्धात आतापर्यंत 900 इस्रायलींचा मृत्यू झाला असून 2,600 जखमी झाले आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. इस्रायलकडून गाझा पट्टीत एअर स्ट्राइक सुरुच आहेत. त आतापर्यंत 687 पॅलेस्टाइनचा मृत्यू झाला आहे. गाझन आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलीय. अन्य 3000 जखमी झाले आहेत.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान