
मध्य पूर्वेत इस्रायल-इराणमध्ये घनघोर लढाई सुरु आहे. दररोज दोन्ही बाजूंकडून मिसाइलचा पाऊल पडतोय. तेल अवीव, हायफा या इस्रायली शहरांमध्ये इमारतींच मोठ नुकसान झालं आहे. दुसऱ्याबाजूला इराणचे अणवस्त्र प्रकल्प, सैन्य तळ, बॅलेस्टिक मिसाइल कारखाने यावर हल्ले सुरु आहेत. मात्र, त्यानंतरही इराणकडून इस्रायलवरील मिसाइल हल्ले कमी झालेले नाहीत. उलट इराणने आता हायपरसोनिक मिसाइलचा वापर सुरु केलाय. इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिम हे मिसाइल हल्ले रोखण्यात कमी पडत आहे. दुसऱ्याबाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांना, इस्रायल-इराण युद्धात उतरायचं की नाही? हेच अजून ठरवता येत नाहीय. अमेरिका अजूनही गोंधळलेल्या मानसिकतेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सध्या फक्त धमक्या दिल्या जात आहेत.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी तेहरान रिकामी करण्याची सोशल मीडियावरुन धमकी दिली होती. त्यावेळी अनेकांना वाटलं की, अमेरिका एक-दोन दिवसात इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ला करेल. आता बातमी अशी आहे की, युद्धात उतरायचं की नाही? हे अमेरिका दोन आठवड्यानंतर ठरवणार आहे. या सगळ्यामध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची आहे. पण कचखाऊ धोरणामुळे उलट आता अमेरिकेवर दबाव येऊ लागला आहे. रशिया-चीने हे देश इराणच जाहीर समर्थन करतायत.
अमेरिकेला भिती काय?
इराणकडून सुद्धा अमेरिकेला धमकावण्यात आलय. युद्धात उतरु नका अशी इराणने अमेरिकेला धमकी दिली आहे. तुम्ही मध्ये आलात, तर तुमच्यावरही हल्ले करु असं इराणने धमकावलय. इराणची क्षेपणास्त्र अमेरिकेपर्यंत पोहोचणार नसली, तरी मध्य पूर्वेत अमेरिकेचे जे सैन्य तळ आहेत, तिथे इराण मिसाइल हल्ला करेल अशी अमेरिकेला भिती आहे.
इराणच्या धमकीचा काय परिणाम दिसला?
इराणच्या या धमकीनंतर अमेरिकेवर त्याचे परिणाम सुद्धा दिसू लागले आहेत. मध्य पूर्वेत कतरमध्ये अमेरिकेचा अल उदीद एअर बेस आहे. या एअर बेसवर अमेरिकेची फायटर विमान दिसत नाहीयत. इथे इराणकडून एअर स्ट्राइक होण्याची भिती असल्याने अमेरिकेने या बेसवरुन त्यांची विमान हलवल्याची शक्यता आहे. एएफपीने हे वृत्त दिलं आहे.
Satellite images of Al Udeid Air Base in Qatar, one of the U.S. Air Force’s most important bases in the Middle East, appear to show the base now completely abandoned. The base, which regularly maintains dozens of military aircraft, including aerial-refueling tankers, surveillance… pic.twitter.com/k102I9raP7
— OSINTdefender (@sentdefender) June 18, 2025
सॅटलाइट फोटोंमधून खुलासा
सॅटलाइट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे. 5 जून रोजी प्लॅनेट लॅब पीबीसीच्या फोटोमध्ये अल उदीद एअर बेसवर अमेरिकेची 40 फायटर विमान दिसत होती. यात हरक्युलस C-130 हे ट्रान्सपोर्ट विमान सुद्धा होतं. पण 19 जूनच्या फोटोमध्ये या एअरबेसवर फक्त तीन अमेरिकी विमान दिसतायत.