Israel Iran War : मोसादने इराणला आतमधून पोखरलं, कुठल्याही क्षणी काहीही मोठं घडेल, काल पाण्याची पाईपलाइन, आज काय?

Israel Iran War : इराण आणि इस्रायलमध्ये जरी युद्ध सुरु असलं तरी ते हवाई युद्ध आहे. दोन्ही देशांमध्ये अजून आमने-सामनेची जमिनीवरील लढाई सुरु झालेली नाही. ती होण्याची शक्यता सुद्धा फार नाही. याचं कारण आहे दोन देशांमधील अंतर. इस्रायल आणि इराणची सीमा परस्पराला लागून नाही. या दोन देशांमध्ये जॉर्डन हा देश आहे. त्यामुळे या भौगोलिक स्थितीचा आपल्याला कसा फायदा होईल हा विचार करुनच इस्रायलने पावलं टाकली.

Israel Iran War : मोसादने इराणला आतमधून पोखरलं, कुठल्याही क्षणी काहीही मोठं घडेल, काल पाण्याची पाईपलाइन, आज काय?
iran israel feature
| Updated on: Jun 17, 2025 | 9:01 AM

इस्रायल-इराण युद्धाने भीषण रुप धारण केलं आहे. इराणी नागरिकांनी तेहरान सोडण्यास सुरुवात केली आहे. तेहरानच्या रस्त्यावर शहराबाहेर निघणाऱ्या वाहनांच ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात दिसत आहे. इस्रायलने आधीच तेहरान रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. कुठल्यातरी भयानक हल्ल्याची ही चाहूल आहे. कारण काहीतरी मोठ घडणार असेल, तेव्हाच अशी सूचना दिली जाते. इराणच्या मिसाइल हल्ल्यात इस्रायलमधील तेल अवीव, हायफा या शहरांच मोठ नुकसान झालं आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे तेहरानवरील संभाव्य भीषण हल्ला हे त्याचच प्रत्युत्तर असेल. सध्या दोन्ही देशांच सैन्य परस्परांच जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे. पण अचूक हल्ले करुन जास्तीत जास्त यश मिळवण्यात इंटेलिजेंसची भूमिका महत्त्वाची आहे. यामध्ये इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने इराणच प्रचंड नुकसान केलं आहे. इराणच्या गुप्तचर संस्थेच नाव VAJA असून त्यांनी पलटवार सुरु केलाय.

दोन्ही देशांचे गुप्तचर सिक्रेट मिशन्सवर आहेत. तेहरानमध्ये मोसादच्या काही एजटन्सना पकडण्यात आलय. एकाबाजूला मिसाइल स्फोटाचे आवाज, ड्रोन हल्ले दुसऱ्याबाजूला कोणाला काही कळू न देता घातक मिशन्स प्रत्यक्षात आणणारी फौज. आतापर्यंत पाच दिवसांच्या युद्धात मोसादने इराणला हादरवून सोडलय. अचूक इंटेलिजेंसच्या बळावर इराणचे अणवस्त्र प्रकल्प, सैन्य ठिकाणं यावर हल्ले केलेच. पण इराणचे अणवस्त्र शास्त्रज्ञ, बडे लष्करी अधिकारी यांना सुद्धा संपवलं. इराणवर हा सर्वात मोठा आघात होता.

म्हणूनच पहिल्या हल्ल्यात इराणच सैन्य नेतृत्वहीन

जग पुन्हा एकदा मोसादच्या या कामगिरीने थक्क झालय. इस्रायलने इराणवर जितके बॉम्ब हल्ले केले ते अत्यंत अचूक होते. इस्रायलचा प्रत्येक हल्ला इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर होता. इराणी कमांडर्स कुठे आहेत? त्याची माहिती मोसादकडे आधीपासूनच होती. मोसादने आधीच आपल्या एअरफोर्सला सांगितलेलं, अणवस्त्र कार्यक्रमाशी संबंधित वैज्ञानिक कुठे आहेत. म्हणूनच इस्रायलच्या पहिल्या हल्ल्यात इराणच सैन्य नेतृत्वहीन झालं.

आता पेजर अटॅक प्रमाणे कार बॉम्बस्फोट

मोसाद आता पेजर अटॅक प्रमाणे इराणमध्ये कार बॉम्बस्फोट घडवून आणत आहे. मोसादने इराणच्या पाणी पुरवठा सिस्टिमवर हल्ला केला. मोसादचे एजंट्स आता इराणची गुप्तचर यंत्रणा VAJA च्या एजंट्सची हत्या करत आहेत. त्यांनी इराणी गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयावर हल्ला केला. इराणी इंटेलिजेंसचे चीफ आणि डेप्युटी चीफची हत्या झाली आहे. इराणचे टॉप 4 इंटेलिजेंस ऑफिसर मारले गेले आहेत.

तेहरानमध्ये रस्त्यावर पूर सदृश्य स्थिती

इराणकडून मोसादच्या एजंट्सना पकडण्यासाठी अभियान सुरु आहे. पण त्याचवेळी मोसादच्या एजंट्सनी इराणला हादरवून सोडलय. रिपोर्टनुसार कारमध्ये बॉम्ब प्लान्ट केले जात आहेत. एकादिवसात इराणमध्ये पाच पेक्षा जास्त बॉम्बस्फोट झाले आहेत. इराणची राजधानी तेहरानमध्ये रस्त्यावर पूर सदृश्य स्थिती पाहून सगळेच हैराण झालेत. पाण्याच्या पाइपलाइनमध्ये स्फोट झालेत. त्यामुळे तेहरानच्या रस्त्यावर पुरासारखी स्थिती आहे.