Israel Govt Formation : इस्रायलमध्ये अखेर मुस्लिम आघाडीकडूनच मोदींचे जवळचे मित्र नेतन्याहू यांचा गेम, पुन्हा सत्ताधीश बनण्याचं स्वप्न उद्धवस्त

Israel Govt Formation : इस्रायलमध्ये नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यानंतर तिथे सत्तेवर कोण बसणार, याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. अखेर आता हळूहळू तिथे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होताना दिसतोय.

Israel Govt Formation : इस्रायलमध्ये अखेर मुस्लिम आघाडीकडूनच मोदींचे जवळचे मित्र नेतन्याहू यांचा गेम, पुन्हा सत्ताधीश बनण्याचं स्वप्न उद्धवस्त
benjamin Netanyahu vs gadi Eisenkot
Image Credit source: Reuters
| Updated on: Nov 05, 2026 | 10:15 PM

इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. इस्रायलमध्ये अरब पक्षांच्या आघाडीने बेंजामिन नेतन्याहू यांचे प्रतिस्पर्धी गादी आयजनकोट यांना समर्थन देण्याची घोषणा केली आहे. अरब पक्षांची आघाडी राष्ट्रपती इसाक हर्जोग यांच्याकडे पुढचे पंतप्रधान म्हणून याशार पार्टीचे अध्यक्ष गाजी आयजनकोट यांच्या नावाची शिफारस करणार आहेत. इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत अरब पक्षांनी एकूण 11 जागा जिंकल्या आहेत. राआम पार्टीने आधीच गादी यांना समर्थन देण्याची घोषणा केली आहे. इसाक हर्जोग इस्रायलचे राष्ट्रपती आहेत. राआमचे प्रमुख मंसूर अब्बास राष्ट्रपतींकडे आयजनकोट यांना सरकारला समर्थन देण्याची शिफारस करणार आहेत असं वृत्त द टाइम्स ऑफ इस्रायलमध्ये 4 नोव्हेंबरला प्रकाशित झालं होतं. राआम पक्षाकडे 8 जागा आहेत.

नेतन्याहू यांच्या हाती पुन्हा सत्ता देऊ नका ही जनतेची मागणी आहे, त्यासाठी अरब आघाडीतील तिन्ही पक्षांनी आयजनकोट यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे, असं टाइम्स ऑफ इस्रायलने म्हटलं आहे. अरब पक्ष लवकरच राष्ट्रपती हर्जोग यांच्यासमोर शिफारस करणार आहेत. विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यापेक्षा आजयनकोट यांना इस्रायली संसदेतील जास्त सदस्यांचं समर्थन आहे. आयजनकोट ज्या आघाडीचं नेतृत्व करतात, त्यांना 48 जागा मिळाल्या आहेत. जॉइंट लिस्टकडे 11 जागा आहेत. राआम पार्टीकडे आठ जागा आहेत. एकूण मिळून गादी यांच्या आघाडीच्या 67 जागा होतात.

Loading...

इस्रायली संसदेत बहुमताचा आकडा काय?

120 सदस्यांच्या इस्रायली संसदेत बहुमताचा आकडा 61 आहे. या सगळ्या घटनाक्रमानंतर गुरुवारी संध्याकाळी सर्व पक्षांची चर्चा झाल्यानंतर आयजनकोट आता अशा स्थितीत आहेत की, त्यांना राष्ट्रपती हर्जोग यांच्याकडून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण मिळू शकतं. वामपंथी डेमोक्रेट्स पार्टी आणि राअम दोघांनी आयजनकोट यांच्या नावाची शिफारस केली आहे. दे जेरुसलेम पोस्टनुसार राअमचे नेते मंसूर अब्बास म्हणाले की, आमचा पक्ष हमासचं संपूर्ण निशस्त्रीकरण करण्याच्याबाजूने आहे. हमासला दहशतवादी संघटना ठरवण्याच्या प्रश्नावर अब्बास म्हणाले की, अरब समाज, एक व्यक्ती म्हणून मी स्वत:आणि एकूण मिळून सर्व अरब नागरिक एका पुलासारखे आहेत. हा पूल आपण नको तोडूया.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us