Israel Election PM Benjamin Netanyahu : हे दोन मुस्लिम नेते ठरवणार नेतन्याहू इस्रायलचे पुढचे पंतप्रधान बनणार की नाही?

Israel Election PM Benjamin Netanyahu : इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी कालच मतदान झालं. विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे कट्टर मुस्लिम विरोधक म्हणून ओळखले जातात. पण त्यांचं पंतप्रधानपद आता दोन मुस्लिम नेत्यांच्या हातात आहे.

Israel Election PM  Benjamin Netanyahu : हे दोन मुस्लिम नेते ठरवणार नेतन्याहू इस्रायलचे पुढचे पंतप्रधान बनणार की नाही?
Israel Election
| Updated on: Oct 28, 2026 | 3:53 PM

इस्रायल निवडणुकीनंतर एक्झिट पोलमधून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. इस्रायली नेसेटमध्ये यावेळी कुठल्याही आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार नाहीय. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा असूनही पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू स्वबळावर सरकार स्थापन करु शकणार नाहीत. एक्झिट पोलचे आकडे निकालामध्ये बदलले तर नेतन्याहू यांच्या अडचणी वाढू शकतात. अशा स्थितीत दोन मुस्लिम नेत्यांच्या हातात सत्तेची चावी असेल. इस्रायलच्या राजकारणात हे मुस्लिम नेते नेतन्याहू यांचे विरोधक मानले जातात.

टाइम्स ऑफ इस्रायलनुसार नेतन्याहू यांच्या आघाडीला 55 जागांवर विजय मिळू शकतो. तेच त्यांचे विरोधक आयजनकोट यांच्या आघाडीला 49 जागा मिळू शकतात. अरब समर्थित दोन पक्षांना 16 जागांवर आघाडी आहे.

Loading...

या मुस्लिम नेत्यांकडे सत्तेची चावी

यूसुफ जबरीन : यूसुफ जबरीन यांच्या आघाडीला 12 जागांवर विजय मिळू शकतो. जबरीन 2016 मध्ये पहिल्यांदा नेसेटचे सदस्य बनले. 2021 पर्यंत ते या पदावर होते. त्यांनी सर्व अरब पक्षांची मिळून एक आघाडी तयार केली आहे. इस्रायलच्या राजकारणात जबरीन यांना नेतन्याहू यांचा विरोधक मानलं जातं.

निकालानंतर जबरीन यांच्यावर बरच काही अवलंबून असेल. जबरीन ज्या बाजूला जाणार, त्या पक्षाचं इस्रायलमध्ये सहज सरकार स्थापन होऊ शकतं. कारण नेतन्याहू यांच्या आघाडीकडे 55 जागा आहेत. आयजनकोट यांच्या आघाडीकडेही जवळपास तितक्याच जागा आहेत.

मंसूर अब्बास : आरएएम आघाडीचे नेते मंसूर अब्बास यांच्या पक्षाला इस्रायलमध्ये चार जागांवर विजय मिळताना दिसतोय. मंसूर अब्बल कट्टरपंथी मुस्लिम नेते आहेत. अब्बास यांच्या समर्थनाचा थेट परिणाम होणार नाही. पण अब्बास जर यूसुफ सोबत कुठल्या आघाडीकडे गेले, तर त्याचा परिणाम होऊ शकतो.

व्हाइट हाऊसचं तिसरं समीकरण बनवण्याचा प्रयत्न 

वॉशिंग्टन पोस्टनुसार नेतन्याहू आणि आयजनकोट यांच्यामध्ये आघाडी घडवून आणण्याचा व्हाइट हाऊसचा प्रयत्न आहे. दोन्ही नेत्यांनी एकत्र काम करावं अशी व्हाइट हाऊसची इच्छा आहे.

आघाडी बनवून सरकार चालवण्याचा आयजनकोट यांचा प्रयत्न आहे. एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर ट्रम्प यांनी स्वत:ला विजयाचं क्रेडिट दिलं आहे. मी इस्रायलमध्ये जिंकतोय असं ट्रम्प पत्रकारांना म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us