Flydubai Jet : इस्रायल खूप खतरनाक देश, फ्लायदुबईचं विमान इस्रायलमध्ये आलं असतं तर पुढे काय घडणारं होतं ते आलं समोर
Flydubai Jet : अशी परिस्थिती कधीही येऊ शकते याचा इस्रायलने खूप आधीच विचार करुन ठेवला आहे. सूत्रांच्या हवाल्याने CBS न्यूजने हे वृत्त दिलं. काही सेकंदात विमान 18 हजार फूट खाली आल्यानंतर इस्रायली एअर फोर्सच्या विमानांनी क्षणाचा विलंब न लावता झपकन उड्डाण केलं.

मागच्या आठवड्यात फ्लाय दुबईचं प्लेन क्रॅश करण्याचा प्रयत्न झाला. ओमानी सहवैमानिक हमाम अल हमामीने विमान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. विमान हजोर फूट उंचीवरुन अचानक खाली आलं. त्यावेळी भारतीय वैमानिक स्मित मछारने विमानातच हमाम अल हमामीशी दोन हात केले व त्याचा विमान पाडण्याचा प्रयत्न हाणून पाडला. हे विमान दुबईहून इस्रायलला चाललं होतं. विमानाने जॉर्डनच्या एअर स्पेसमध्ये प्रवेश करताच हमाम अल हमामीने भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मछार यांच्यावर हल्ला केला. कॉकपीटमध्ये हा सर्व प्रकार घडला. स्मित मछार यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून विमानातील 174 प्रवाशांचे प्राण वाचवले. स्मित मछार यांचं जगभरात कौतुक सुरु आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्मित मछार यांचं कौतुक केलं. त्यांनी 9/11 सारखी घटना टाळली.
फ्लाय दुबईचे हे प्लने इस्रायलकडे निघालं होतं. या विमानातून हायजॅकचा संदेश पाठवण्यात आला. त्यानंतर इस्रायली एअरफोर्सने तात्काळ पावलं उचलली. परिस्थिती हाताबाहेर गेली असती, तर इस्रायल या फ्लाय दुबईच्या विमानासोबत काय करणार होता? ते आता समोर आलय. सीबीएसने न्यूजने हे वृत्त दिलय. इस्रायलने फ्लाय दुबईचं हे प्रवासी विमान पाडण्याची तयारी ठेवली होती. कारण हे विमान क्रॅश करण्यात हमाम अल हमामी यशस्वी ठरला असता, तर जास्तीत जास्त जिवीतहानी होऊ शकली असती. 174 पैकी बहुतांश इस्रायली नागरिक या विमानात होते.
इस्रायलमध्ये त्यावेळी काय घडलं?
9/11 सारखा हल्ला होऊ शकतो, अशी परिस्थिती कधीही येऊ शकते याचा इस्रायलने खूप आधीच विचार करुन ठेवला आहे. सूत्रांच्या हवाल्याने CBS न्यूजने हे वृत्त दिलं. काही सेकंदात विमान 18 हजार फूट खाली आल्यानंतर इस्रायली एअर फोर्सच्या विमानांनी क्षणाचा विलंब न लावता झपकन उड्डाण केलं. इस्रायली एअर फोर्सने कॉकपीटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर इस्रायलजी जी ठरलेली प्रक्रिया आहे त्यानुसार, आधीपासून अशा घटना हाताळण्यासाठी बनवण्यात आलेल्या कमिटीने लगेच कमांड सेंटर स्थापन केलं.
पण ते विमान सौदी अरेबियाकडे वळालं
लगेच फायटर जेट्स झेपावली. इस्रायली एअरस्पेस बंद केला. ते फ्लायदुबईचं प्लेन इस्रायलच्या दिशेने येणार असं इस्त्रायली यंत्रणांना वाटलेलं. पण ते विमान सौदी अरेबियाकडे वळालं. भारतीय वैमानिकाने कॉकपीटचा दरवाजा कसाबसा उघडला. प्रवाशांनी हल्लेखोर पायलटला पकडलं. दोन ऑफ ड्युटीवर असलेल्या वैमानिकांनी विमान नियंत्रणात आणलं व ताबूक येथे इमर्जन्सी लँडिंग केलं.
अंतिम निर्णय कोण घेतो?
हायजॅक स्थितीचा सामना करण्यासाठी इस्रायलचे काही प्रोटोकॉल्स आहेत. ग्राऊंड कमांड सेंटर वेळेत विमानाशी संपर्क प्रस्थापित करु शकलं नाही, तर फायटर प्लेनमधून विमानाच्या आत काय चाललय हे जाणून घेण्याचा प्रयत्न होतो. विमान हायजॅक झालय आणि हायजॅकर्स काही बोलत नसतील, काही त्यांच्या मागण्या नसतील, तर कमिटी संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधते. प्रोटोकॉलनुसार इस्रायलमध्ये असं विमान हवेतचं नष्ट केलं जातं. पण अंतिम निर्णय पंतप्रधानांचा असतो असं सूत्रांनी CBS ला सांगितलं.