Actor Life: प्रायव्हेट इव्हेंटच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्याकडे अश्लील मागणी; 16 लाखांचा रेट फिक्स केल्याचा दावा, संतापात म्हणाला…
Actor Life: झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यानेकडे प्रायव्हेट इव्हेंट सांगत अश्लील मागणी करण्यात आलेली. एवढंच नाही तर, त्याचा 16 लाख रुपयांचा रेट फिक्स करण्यात आलेला. घडलेल्या घटनेवर अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे.

Actor Life: बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं फक्त नव्या अभिनेत्रींसाठीच नाही तर, अभिनेत्यांसाठी देखील फार काठीण असतं. अभिनेत्यांना देखील असे अनुभव येतात जे फार भयानक असतात. असंच एक भयानक अनुभव टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता अंगद हसीजा याला देखील आला. टीव्ही अभिनेता अंगद हसीजा याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याला ‘बिदाई’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. या अभिनेत्याने शार्दुलच्या पॉडकास्टमध्ये आपल्या आयुष्यातील सर्वात विचित्र आणि कठीण फोन कॉलॉबद्दल सांगितलं. एका इव्हेंटच्या बाबतीत त्याच्यासोबत फसवणूक होणार होती.
अंगदने सांगितले की, त्याला एका इव्हेंटला उपस्थित राहण्यासाठी कॉल आला होता. त्या काळात देश-विदेशात अनेक इव्हेंट होत असत. अभिनेत्याला इव्हेंटसाठी बोलावलं गेलं, पण इव्हेंटबद्दल कोणतीच माहिती दिलेली नव्हती. अंगदने जेव्हा विचारले की इव्हेंटमध्ये नेमकं काय करायचं आहे, डान्स करायचा का आणि कपडे कोणते घालायचे? तेव्हा त्याला फक्त एवढेच सांगण्यात आले की हा एक ‘प्रायव्हेट इव्हेंट’ आहे.
अंगदला वाटलं की एखादा कौटुंबिक कार्यक्रम असेल आणि कमी लोकांमध्ये इव्हेंट होईल. अभिनेत्याला मोठी रक्कम देण्याची ऑफर दिली गेली. त्याला 15 – 16 लाखांची ऑफर देण्यात आली. ही रक्कम ऐकून अंगद थक्क झाला, कारण तेव्हा त कोणत्याही इव्हेंटसाठी इतकी मोठी रक्कम मिळत नव्हती. अशा परिस्थितीत काहीतरी गडबड असल्याचं अभिनेत्याला जाणवलं.
त्या व्यक्तीने अंगदला वारंवार विचारलं की, तू हा इव्हेंट करशील का? आणि काही अडचण तर येणार नाही ना? हे प्रश्न ऐकून अभिनेता तणावात आला. त्यानंतर त्याने आपल्या शंकांचे निरसन करून घेतलं. अंगदने जेव्हा आग्रहाने इव्हेंटचा तपशील मागितला, तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिले – “सर, तुम्हाला तर माहीतच असेल. सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही ‘पेड’ आहात.” हे उत्तर ऐकून अभिनेता अवाक् झाला.
अंगदने इव्हेंटसाठी नकार देण्यापूर्वीच त्याच्या खात्यात 16 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. अंगदने तात्काळ हे पैसे परत केले आणि इव्हेंट करण्यास नकार दिला. अंगदने सांगितलंकी त्या कॉलमुळे तो प्रचंड तणावाखाली होता. अभिनेत्याला सांगण्यात आले की सगळेच कलाकार ‘पेड’ असतात आणि ही एक सामान्य गोष्ट आहे. अंगदच्या मते, या फोन कॉलमुळे त्याला खूप लाजिरवाणे वाटलं होतं.
