इस्रायल असा घेणार बदला, तयारी पाहून मुस्लीम देशांची उडाली झोप

Israel vs iran : इस्रायल आणि इराण या दोन देशांमधील तणाव आता आणखी वाढला आहे. कारण दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आहेत. आता इस्रायलने त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेजारील मुस्लीम राष्ट्रांची देखील झोप उडाली आहे.

इस्रायल असा घेणार बदला, तयारी पाहून मुस्लीम देशांची उडाली झोप
israel vs iran
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 11:49 PM

इस्रायलने इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. परंतु कारवाई केव्हा आणि कशी केली जाईल याबद्दल अद्याप काहीही सांगितले नाही. गाझामध्ये इस्रायलवर आधीच हल्ले केले आहेत. त्यामुळे तेथे मोठे नुकसान झाले आहे. पण आता इराणकडून इस्रायलवर हल्ला झाल्यानंतर या भागात अशांतता निर्माण होण्याची भीती आहे. मात्र, इराणचा हल्ला हाणून पाडण्यासाठी मदत करणारे इस्रायलचे जवळचे मित्र अमेरिका आणि ब्रिटन परिस्थिती चिघळू नये यासाठी प्रयत्न करत आहेत.

ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरॉन यांनी बुधवारी सांगितले की, इराणने आठवड्याच्या शेवटी केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कारवाई करायची की नाही हे इस्रायल ठरवत आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव कॅमेरून आणि जर्मन परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक या दोघांनीही बुधवारी इस्रायलच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली. इस्रायल हल्ला करण्यापूर्वी मित्र देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलून आपली भूमिका मांडत आहे. या चर्चेनंतर इस्रायल कधीही इराणवर हल्ला करू शकतो, असे मानले जात आहे.

इराणने इशारा दिला आहे की, आपल्या भूभागावर कोणताही छोटा हल्ला झाला तरी त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी वार्षिक लष्करी परेडला संबोधित करताना हे वक्तव्य केले आहे. पण इस्रायली प्रत्युत्तराच्या भीतीमुळे ही लष्करी परेड टीव्हीवर दाखवली गेली नाही.

इस्रायलने हल्ला केल्यास इराणही चोख प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. इराणने आधीच सांगितले आहे की ते दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर देतील. इराणने यापूर्वी 400 हायपरसॉनिक, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. दुसरीकडे इराणच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देता यावे यासाठी इस्रायलनेही मंगळवारी तयारी दाखवली आहे.

इस्रायल इराणवर पाच प्रकारे हल्ला करू शकतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इस्रायल इराणवर थेट हवाई हल्ला करू शकतो. दुसरे म्हणजे तो इराणच्या लष्करी तळावर हवाई हल्ले करु शकतो. इस्रायलकडे 618 विमाने, 41 लढाऊ विमाने, 230 मल्टीरोल विमाने, 128 हेलिकॉप्टर आहेत. याशिवाय इस्रायल पाणबुडीतून इराणवर क्षेपणास्त्र हल्ले करू शकतो. इस्रायलकडे 6 पाणबुड्या आहेत. चौथे, इस्रायल इराणवर ड्रोनद्वारे हल्ला करू शकतो. ड्रोनच्या सहाय्याने इस्रायल इराणचा मित्र लेबनॉनचा हिजबुल्लाह, येमेनचा हुथी आणि गाझामधील हमास दहशतवाद्यांचाही नाश करू शकतो.

एवढेच नाही तर इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद इराणी लष्कराच्या ठिकाणांवर हल्ले करू शकते. याशिवाय तेथील संगणक तज्ञ इराणवर सायबर हल्ले करू शकतात. पण इस्रायलने हल्ले केले तर याचा परिणाम आजुबाजुच्या मुस्लीम देशांवर देखील होऊ शकतो. इस्रायलची ही तयारी आणि हल्ल्याची रणनीती पाहून त्यांना धक्का बसला आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.