
सीजफायर समाप्त होताच इस्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीवर हल्ले सुरु झाले आहेत. गाझामध्ये हल्ले करताना इस्रायलकडून एक मोठी चूक झाली आहे. ती इस्रायलने कबूल सुद्धा केली आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात इमर्जन्सी सेवेच्या 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. इस्रायलने या बाबत आता एक स्टेटमेंट केलं आहे. 23 मार्चला दक्षिण गाजामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात इमर्जन्सी सेवेच्या 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. आपल्याकडून ही चूक झाल्याच इस्रायली सैन्याने कबूल केलं आहे. पॅलेस्टाइन रेड क्रिसेंट सोसायटी (पीआरसीएस) रुग्णवाहिकेच्या ताफ्यावर हल्ला झाला. यात संयुक्त राष्ट्राची एक कार होती तसच गाझा सिविल डिफेन्स फायर ब्रिगेडच्या ट्रकवर राफाजवळ गोळीबार करण्यात आला.
इस्रायलने आधी म्हटलं होतं की, ताफा रात्रीच्या अंधारात संशयास्पद स्थितीत पुढे सरकत होता. त्यामुळे इस्रायली सैनिकांनी गोळीबार केला. या वाहनांच्या वाहतुकी संबंधी सैन्याला माहिती दिली नव्हती, असंही सांगण्यात आलं होतं.
जखमींच्या मदतीसाठी जेव्हा आवाज दिला जात होता, त्यावेळी वाहनांच्या लाइट सुरु होत्या. या हल्ल्यात मरण पावलेल्या एका पॅरामेडिक्सच्या फोनमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ फुटेजमधून हा खुलासा झाला आहे. मृतांमध्ये सहा डॉक्टर हमासशी संबंधित होते, असं इस्रायली सैन्याकडून सांगण्यात आलं होतं. पण त्यांनी अजूनपर्यंत हे आरोप सिद्ध करणारे पुरावे दिलेले नाहीत.
कुठलही शस्त्र सापडलं नाही
सैनिकांनी गोळीबार केल्यानंतर वाहनाची तपासणी केली, त्यावेळी मृतांकडे कुठलही शस्त्र सापडलं नाही, हे इस्रायली सैन्याने कबूल केलं. हल्ल्याचा हा व्हिडिओ पाच मिनिटांपेक्षा मोठा आहे. रेफत रादवान नावाचा पॅरामेडिक प्रार्थना करताना दिसतो. त्यानंतर इस्रायली सैनिकांचा आवाज ऐकू येतो.
वाटलं की, ते संकटात आहेत
IDF च्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, त्यांच्या सैनिकांनी आधी एका कारवर गोळीबार केला होता. यात हमसाचे तीन लोक होते. त्यानंतर रुग्णवाहिका पुढे गेल्यानंतर एयर सर्विलांस मॉनिटर्सच्या सैनिकांनी ताफा पुढे जात असल्याच सांगितलं. रुग्णवाहिका हमासच्या कारजवळ थांबली. त्यावेळी सैनिकांना वाटलं की, ते संकटात आहेत, म्हणून त्यांनी गोळीबार केला.
निशाणा लावण्यात आला होता
इस्रायलने मान्य केलं की, आधी जी माहिती दिली ती चुकीची होती. यात असं म्हटलेलं की, ताफ्यातील वाहन विनलाइटची होती. वाहनांवर निशाणा लावण्यात आला होता. पॅरामेडिक्सने युनिफॉर्म घातल होता, ही माहिती व्हिडिओमधून समोर आली आहे.