AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War: इस्त्रायल-हमास युद्ध थांबणार, इस्त्रायल सुरक्षा मंत्रिमंडळाची युद्धविरामला मंजुरी

Israel-Hamas War: पंतप्रधान वेजामिन नेतन्याहू मंत्रिमंडळातील अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच आणि राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन गवीर यांनी सुरक्षा मंत्रिमंडळातील युद्धविरामच्या निर्णयाच्या विरोधात मतदान केले.

Israel-Hamas War: इस्त्रायल-हमास युद्ध थांबणार, इस्त्रायल सुरक्षा मंत्रिमंडळाची युद्धविरामला मंजुरी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 17, 2025 | 9:03 PM
Share

Israel-Hamas War: अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या इस्त्रायल-हमास युद्ध आता थांबणार असल्याची चिन्ह आहेत. इस्त्रायल सुरक्षा मंत्रिमंडळाने युद्ध विरामाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या निर्णयास मंजुरी देण्यात आली. इस्त्रायल माध्यमांनी युद्धविरामचा हा निर्णय ओलीसांच्या सुटकेसाठी केलेला करार असल्याचे म्हटले आहे. अजून यावर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

आता पूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष

पंतप्रधान वेजामिन नेतन्याहू मंत्रिमंडळातील अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच आणि राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन गवीर यांनी सुरक्षा मंत्रिमंडळातील या निर्णयाच्या विरोधात मतदान केले. या बैठकीपूर्वी पंतप्रधान नेतन्याहू यांनी करारावर स्वाक्षरी करून दोहाहून परतलेल्या टीमसोबत बैठकही घेतली होती. आता या करारावर मंत्रिमंडळात निर्णय होईल. त्यानंतर युद्धविराम होणार की नाही? हे स्पष्ट होणार आहे.

इस्त्रायलच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक शुक्रवारी 3:30 वाजता होणार आहे. परंतु अनेक मंत्र्यांसह हरेडी यांचे मत होते की करारावर मतदान शनिवारपर्यंत केले जावे. गुरुवारी संध्याकाळी इस्रायली प्रसारमाध्यमांमध्ये बातमी दिली. त्यात म्हटले की, मंत्रिमंडळाची पूर्ण बैठक शनिवारी संध्याकाळी घेतल्यास रविवार ते सोमवार या कराराच्या अंमलबजावणीला विलंब होऊ शकतो. तथापि, नेतन्याहू यांच्या कार्यालयाने नंतर सांगितले की, करार ठरल्याप्रमाणे रविवारी अंमलात येईल.

7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने युद्धाची घोषणा केली होती. हमासच्या सैनिकांनी इस्त्रायलच्या 300 नागरिकांना कैद केले होते. त्यापैकी इस्त्रायलीने केलेल्या हल्ल्यामुळे डझनभर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायलच्या दाव्यानुसार अनेक ओलीसांची हमासने हत्या केली होती.

हमासच्या कैदेत अजून इस्त्रायलचे 33 नागरिक ओलिस असल्याचे सांगितले जाते. परंतु त्यापैकी किती जिवंत आहेत हे स्पष्ट नाही. हमासने सर्व नागरिकांना सोडावे आणि मारले गेलेल्यांचे मृतदेह परत करावेत. या कैद्यांची सुटका आणि इस्रायली तुरुंगातून पॅलेस्टिनींची सुटका होण्यासाठी ४२ दिवस लागतील.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान