Iran Israel War : ट्रम्प यांच्या शब्दाला शून्य किंमत, उलट सीजफायरच्या घोषणेनंतर इस्रायलच जास्त नुकसान, एकदा हे वाचा

Iran Israel War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहेत. आपण एक महान शांतीचे पुरस्कर्ते नेते आहोत, हे दाखवून देण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असतो. पण या प्रयत्नात पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाचा पोकळपणा दिसून आला आहे. इराणने त्यांना जागा दाखवून दिलीय.

Iran Israel War : ट्रम्प यांच्या शब्दाला शून्य किंमत, उलट सीजफायरच्या घोषणेनंतर इस्रायलच जास्त नुकसान, एकदा हे वाचा
Iran Israel War
| Updated on: Jun 24, 2025 | 10:19 AM

अमेरिका हा जगातील सुपरपॉवर देश आहे. पण या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वर्तन मात्र प्रतिमेला अजिबात साजेस नसतं. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह लागलं आहे. गरजेपेक्षा जास्त बोलण्याची सवय आणि श्रेय घेण्याची भूख यामुळे ट्रम्प पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. भारत-पाकिस्तानच्या बाबतीत जे त्यांनी केलं, तेच आता इराण-इस्रायलच्या बाबतीत ट्रम्प यांनी केलं आहे. रात्री उशिरा ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराण-इस्रायलमध्ये सीजफायर झाल्याची घोषणा केली. आपण हे युद्ध थांबवलं असा त्यांचा दावा होता. पण काहीवेळ आधी पुन्हा हल्ले सुरु झाले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचा दावा किती निराधार, खोटा आहे ते सिद्ध झालय. इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर मिसाइल हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर मिसाइलचा पाऊस पाडला. इराण फक्त इस्रायलवर मिसाइलच डागत नाहीय, तर अमेरिका सुद्धा त्यांचं टार्गेट आहे. मिडल ईस्टमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर मिसाइल हल्ले सुरु आहेत. आधी कतर मग इराकमधील अमेरिकेच्या तीन ठिकाणांवर मिसाइल हल्ला झाला आहे. या हल्ल्यांवरुन इराणचा इरादा किती मजबूत आहे ते दिसून येतं. मध्य पूर्वेतील हा तणाव आणखी वाढू शकतो हे स्पष्ट आहे.

बुहतांश मिसाइल्स हवेतच नष्ट

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजत आहेत. लोक बंकर्सच्या दिशेने पळत आहेत. काल रात्री इराणने कतरमधील अमेरिकेच्या अल-उदीद एअरबेसवर मिसाइल हल्ला केला. त्यांनी एकाचवेळी अनेक मिसाइल्स डागली. पण अमेरिकेने बुहतांश मिसाइल्स हवेतच नष्ट केली. सध्या इथे कुठलं नुकसान झाल्याच वृत्त नाहीय. अल उदीद एअर बेस मिडल ईस्टमधील अमेरिकन सेंट्रल कमांडच्या एअर ऑपरेशन्सच मुख्यालय आहे.

इराणच्या सुप्रीम लीडरने काय म्हटलय?

इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्लाह खामेनेई यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केलीय. त्यात त्यांनी लिहिलय की, “आम्ही कुठल्याही परिस्थिती हल्ला सहन करणार नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही” “इराण अमेरिकेच्या कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला तयार आहे” असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.