Imran Khan Arrest : इमरान खान यांची अटक अवैध; पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

| Updated on: May 11, 2023 | 5:42 PM

इमरान खान यांची अटक अवैध; पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Imran Khan Arrest : इमरान खान यांची अटक अवैध; पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Follow us on

Pakistan Ex PM Imran Khan Arrest News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अटक झाली आहे. त्यावर पाकिस्तानच्या न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं आहे. इमरान खान यांची अटक अवैध असल्याचं न्यायलयाने म्हटलं आहे. इमरान खान यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणावर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने इमरान खान यांच्या अटकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

“इमरान खान यांना कोर्टात हजर करा”

न्यायालय परिसरातून कुणाला अटक करणं योग्य नाही. त्यामुळे पुढच्या एक तासात इमरान खान यांना न्यायालयात दाखल करण्यात यावं, असे आदेश न्यायलयाने दिले आहेत. त्याचबरोबर जेव्हा इमरान खान यांना न्यायालयात आणलं जाईल तेव्हा राजकीय नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायलय परिसरात येऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत.

हा तर न्यायालयाचा अपमान!

कोर्ट परिसरातून इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे. ही अशी अटक करणं म्हणजे न्यायालयाचा अपमान आहे. इमरान खान यांना अशी अटक करून एनएबीने न्यायालयाचा अवमान केला आहे. इमरान खान यांना अटक केल्यानंतर न्यायालयात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कोर्टातून कुणाला अटक कशी-काय करता येईल, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने एनएबीला विचारला आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधील पोलीस इमरान खान यांना घेऊन सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. इमरान खान यांच्याविरोधातील याचिकेवर आता सुनावणी सुरू आहे.

इमरान खान अटक प्रकरण

इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात 9 मेला अटक करण्यात आली. त्यांना नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो अर्थात एनएबीने आणि पाक रेंजर्सने इस्लामाबादच्या उच्च न्यायालय परिसरातून अटक केली. त्यानंतर पाकिस्तानमध्ये विविध घडामोडी घडत आहेत.

इमरान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये विविध घडामोडी पाहायला मिळाल्या. इम्रान खान यांचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. या कार्यकार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. इमरान खान यांच्या समर्थकांनी लष्करावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.