निखिल गुप्ता USA च्या ताब्यात आल्यामुळे भारत-अमेरिका संबंध बिघडणार का?

52 वर्षाच्या निखिल गुप्ताला ब्रुकलिनच्या मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. हे एक फेडरल एडमिनिस्ट्रेटिव डिटेंशन सेंटर आहे. निखिल गुप्ता यांना आज न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टमध्ये हजर केलं जाऊ शकतं.

निखिल गुप्ता USA च्या ताब्यात आल्यामुळे भारत-अमेरिका संबंध बिघडणार का?
जो बायडनImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 12:33 PM

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू प्रकरणात भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांचं प्रत्यार्पण झालं आहे. चेक रिपब्लिकने त्यांना अमेरिकेकडे सोपवलं आहे. अमेरिकन भूमीवर गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच कारस्थान रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणात निखिल गुप्ता आरोपी आहे. फेडरल ब्यूरो ऑफ प्रिजन्स वेबसाइटने निखिल गुप्ताच्या प्रत्यार्पणाची माहिती दिली आहे. गुरपतवंत सिंह पन्नू भारताविरोधात कारवाया करणारा खलिस्तानी दहशतवादी आहे. पण त्याच्याकडे अमेरिकेच नागरिकत्व आहे. 52 वर्षाच्या निखिल गुप्ताला ब्रुकलिनच्या मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. हे एक फेडरल एडमिनिस्ट्रेटिव डिटेंशन सेंटर आहे. निखिल गुप्ता यांना आज न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टमध्ये हजर केलं जाऊ शकतं.

मागच्या महिन्यात निखिल गुप्ता यांना अमेरिकेच्या ताब्यात सोपवण्याला विरोध करणारी याचिका चेक कोर्टाने फेटाळून लावली होती. त्यामुळे चेक रिपब्लिकचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला होता. कोर्टाच्या निकालानंतर गुप्ता यांना कुठल्याही दिवशी अमेरिकेच्या ताब्यात सोपवलं जाईल, असं म्हटलं जात होतं. निखिल गुप्ता मागच्यावर्षी जून महिन्यात भारतातून चेक रिपब्लिकला गेले. तिथे चेक अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. प्रत्यार्पणासंबंधी अमेरिकी न्याय विभागाच्या प्रवक्त्याने टिप्पणी करण्यास इन्कार केलाय. त्याशिवाय गुप्ताचे अमेरिकन वकील अटॉर्नी जेफरी चैब्रोवे यांनी सुद्धा तात्काळ टिप्पणी करण्यास नकार दिलाय. चेक अधिकाऱ्यांनी सुद्धा कुठलही वक्तव्य केलेलं नाही.

भारतीय एजंट्सवर आरोप

अमेरिका आणि कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी आहेत. तिथे त्यांच्या हत्येच कारस्थान रचल्याच्या आरोपावरुन दोन्ही देशांसोबतच्या संबंधांवर परिणाम झाला आहे. भारत सरकारने सातत्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जून 2023 मध्ये कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या झाली. या प्रकरणात भारतीय एजंट्सचा हात असून भारत सरकार सहभागी असल्याचा कॅनडाने आरोप केला. भारताने तात्काळ हे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले. खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडा दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे.

Non Stop LIVE Update
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी.
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा.
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका.
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी.
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद.
नाशिक-मुंबई महामार्ग, कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं सौंदर्य
नाशिक-मुंबई महामार्ग, कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं सौंदर्य.