राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह कोण-कोण विधानसभेच्या रिंगणात

राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह कोण-कोण विधानसभेच्या रिंगणात

| Updated on: Oct 21, 2024 | 4:48 PM

राज्यातील तिसऱ्या आघाडीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांची देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता प्रत्येक राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. अशातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील तिसऱ्या आघाडीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. रविवारी भाजपकडून तब्बल ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यानंतर आज परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यादील १० जागांपैकी ४ जागा प्रहार जनशक्ती पक्षाला, तर दोन जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या असून राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. परिवर्तन महाशक्ती आघाडीने अचलपूरमधून बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रावेरमधून अनिल चौधरी, चांदवड विधानसभा मतदारसंघातून गणेश निंबाळकर, देगलूर बिलोलीमधून सुभाष साबणे, ऐरोलीमधून अंकुश कदम, हदगाव हिमायतनगरमधून माधव देवसरकर, हिंगोलीमधून गोविंदराव भवर, राजुरामधून वामनराव चटप यांनी विधानसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे. तर शिरोळ आणि मिरज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या असून या जागांवर अद्याप उदेवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

Published on: Oct 21, 2024 04:47 PM