Vitthal Birdev Yatra : भंडाऱ्याची उधळण जणू सोन्याची झळाळीच, पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ
कोल्हापूरातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेमध्ये भंडाऱ्याची उधळण केली जाते. तसेच बाळलोकर, खारीक आणि पैशांची सुद्धा उधळण केली जाते. भंडाऱ्याची मुक्त उधळण होत असताना पट्टणकोडोली गावाला जणू सोन्याची झळाळी आल्याचे चित्र पाहायला मिळत असून जेजूरी सारखंच रूप तेथे दिसतं.
महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभरातील भविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कोल्हापूरातील पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. कोल्हापूरातील पट्टणकोडोली येथे धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल येथे विठ्ठल-बिरदेवाचे प्राचीन मंदिर आहे. बिरोबा हे पट्टणकोडोली गावचे कुलदैवत मानले जाते. येथेच दरवर्षी विठ्ठल बिरदेवाची यात्रा भरते. विठ्ठल बिरदेव यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणारी भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि केली जाणारी भाकणूक…या यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक पट्टणकोडोलीमध्ये येत असतात इतकंच नाहीतर कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सुद्धा लाखोंच्या संखेने भाविक दाखल होत असतात. आज देखील मोठ्या संख्येने बिरदेव भक्त पट्टणकोडोलीमध्ये दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. पट्टणकोडोलीमधील विठ्ठल बिरदेव यात्रेदरम्यान झालेल्या गर्दीची ही ड्रोन दृश्य खास टीव्ही 9 च्या प्रेक्षकांसाठी… बधा व्हिडीओ