Bjp1st Candidate List : मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी जाहीर
BJP 1 st Candidate List for Maharashtra Assembly Election 2024 : भाजपकडून आज पक्षातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये सध्या 99 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. यात पूर्वीच्याच काही आमदारांना संधी देण्यात आली आहे तर काहींचा पत्ता कट करण्यात आलाय
भाजपने आज अधिकृतपणे आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ज्यामध्ये तब्बल ९९ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. मुंबईतून भाजपच्या १४ जागा जाहीर झाल्या आहेत. यामध्ये वादग्रस्त वर्सोवा, बोरिवली या जागेवर भाजपच्या पहिल्या यादीत उमेदवार देण्यात आलेला नाही. यासोबत दहिसर आणि घाटकोपर पूर्वमधूनही अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदरासंघातून तिकीट जाहीर झालं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या ९९ जणांच्या यादीत मुंबईत एकाच घरात दोन भावांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार तर मालाडमधून विनोद शेलार यांना उमेदवारी जाहीर कऱण्यात आली आहे.