Jeff Bezos Space Travel: जेफ बेजॉस यांची 11 मिनिटांची अंतराळ सफर, अनेक नवे विक्रम

| Updated on: Jul 21, 2021 | 5:21 AM

व्हर्जिन गेलेक्टिकचे (Virgin Galactic) रिचर्ड ब्रॅनसन (Richard Branson) अंतराळात उड्डान करणारे पहिले अब्जपती पर्यटक ठरलेत.

Jeff Bezos Space Travel: जेफ बेजॉस यांची 11 मिनिटांची अंतराळ सफर, अनेक नवे विक्रम
Follow us on

वॉशिंग्टन : व्हर्जिन गेलेक्टिकचे (Virgin Galactic) रिचर्ड ब्रॅनसन (Richard Branson) अंतराळात उड्डान करणारे पहिले अब्जपती पर्यटक ठरलेत. त्यांनी अमेझॉन (Amazon) संस्थापक जेफ बेजोसला (Jeff Bezos) मागे टाकलं असलं तरी ब्लू ओरिजिनने (Blue Origin) कमीत कमी 2 विक्रम केलेत. जगभराची नजर या अंतराळ यात्रेवर होती. नेमके या यात्रेत कोणते दोन विक्रम झालेत याचाच हा आढावा.

पहिला विक्रम :

जेफ बेजोससोबत या प्रवासात 82 वर्षीय वॅली फंक देखील होते. त्यांची मुख्य ओळख म्हणजे 1960 च्या दशकात NASA चा एस्ट्रोनॉट प्रोग्राम पूर्ण करणारे अंतराळवीर अशी आहे. या अंतराळ प्रवासात जगातील सर्वात वयोवृद्ध अंतराळवीराचा समावेश होता. वॅली फंक यांच्याआधी हा विक्रम जॉन ग्लेन यांच्या नावावर होता. ग्लेन 77 वर्षांचे होते. त्यांनी NASA च्या स्पेस शटल डिस्कवरीत 1998 मध्ये अंतराळ प्रवास केला होता.

दुसरा विक्रम :

ब्लू ऑरिजनच्या या उड्डानासह जगाला सर्वात तरुण अंतराळवीर देखील मिळालाय. 18 वर्षीय ओविलर डेमेन अंतराळात जाणारा सर्वात तरुण व्यक्ती ठरलाय. याआधी हा विक्रम सोवियत संघाच्या गेरमन स्टेपानोविच टिटोव नावाच्या अंतराळवीराच्या नावावर होता. त्याने 6 ऑगस्ट 1961 रोजी वयाच्या 26 व्या वर्षी अंतराळ प्रवास केला होता. डेमेनने 28 मिलियन डॉलर किमतीच्या सिटवर बसून हा प्रवास केला होता.

अपोलो 11 च्या लँडिंगच्या दिवशी ब्लू ओरिजिन लाँच

जेफ बेजोस यांनी 2000 मध्ये ब्लू ओरिजिनची स्थापना केली होती. यानंतर न्यू शेपर्ड स्पेसक्राफ्ट एक दशकापासून प्रोटोटाइप्सची चाचणी करत होते. आज (20 जुलै) अंतराळवीरांना घेऊन पहिल्या फ्लाईटने उड्डान घेतलं. त्यामुळेच आजचा दिवस अंतराळ प्रवासासाठी खास मानला जातोय. कारण आजच्याच दिवशी 52 वर्षांपूर्वी अपोलो 11 (Apollo 11) चंद्रावर उतरलं होतं. ते रॉकेट आणि कॅप्सूलचं नाव 1961 च्या एलन शेपर्ड नावाच्या अंतराळवीरावरुन ठेवण्यातआलं. तो अंतराळात जाणारा पहिला अमेरिकन अंतराळवीर होता.

हेही वाचा :

5 जुलैला अमेझॉनचा राजीनामा, 20 जुलैला थेट अंतराळात उड्डान, काय आहे Amazon प्रमुख जेफ बेजोस यांचं बालपणीचं स्वप्न?

जेफ बेझॉससोबत घटस्फोटानंतर 38,66,37,65,00,000 ची मालकीण, मॅकेंझी स्कॉटचे आता शिक्षकाशी लग्न

नोकरी सोडून गॅरेजमध्ये काम, आता जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, वाचा एक प्रेरणादायी कहाणी

व्हिडीओ पाहा :

Know about new records of Jeff Bezos space travel blue origin