मोठी बातमी! महिला खासदाराकडून थेट पंतप्रधानांवर अंडी फेक, कोसोवो देशात भर संसदेत धक्कादायक प्रकार; लाज काढली!

थोडी लाज धरा, अशा शब्दांत या महिला खासदाराने पंतप्रधानांना सुनावलं आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार घडत असताना संसदेच्या कामकाजाचे लाईव्ह प्रक्षेपण चालू होते. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला असून संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! महिला खासदाराकडून थेट पंतप्रधानांवर अंडी फेक, कोसोवो देशात भर संसदेत धक्कादायक प्रकार; लाज काढली!
kosovo parliament mp throw eggs on pm
Image Credit source: एक्स
| Updated on: Aug 09, 2026 | 6:30 PM

Eggs thrown at PM : देशाची संसद ही एक पवित्र आणि सन्मानाचं स्थान असतं. ससंदेत वेगवेगळ्या गंभीर विषयांवर चर्चा करून तिथे जनतेच्या हिताचे कायदे केले जातात. परंतु आता संसदेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला खासदाराने थेट पंतप्रधानांवर संसदेतच अंडीफेक केली आहे. पंतप्रधानांच्या जवळ जाऊन या महिला खासदाराने अनेक अंडे फेकून मारले आहेत. विशेष म्हणजे थोडी लाज धरा, अशा शब्दांत या महिला खासदाराने पंतप्रधानांना सुनावलंय. हा सर्व प्रकार घडत असताना संसदेच्या कामकाजाचे लाईव्ह प्रक्षेपण चालू होते. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला असून संपूर्ण जगात एकच खळबळ उडालीय.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार कोसोवो या देशात ही धक्कादायक घटना घडली. ससंदेचे कामकाज चालू असताना तेथे विरोधी पक्षाच्या महिला खासदार टाईम काद्रियाज (Time Kadrijaj) यांनी काळजीवाहू पंतप्रधान एल्बिन कुर्ति (Albin Kurti) यांच्या अंगावर थेट अंडे भिरकावले आहेत. कोसोवो देशात 7 जून रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत ‘वेतेवेंदोसजे’ (Vetevendosje) या पक्षाचा विजय झाला. याच सत्ताधारी पार्टीने संसदीय निवडणुकीनंतर नवे सरकार तसेच अन्य संवैधानिक पदांच्या नियुक्तीसाठी विरोधी पक्षांसोबत चर्चेचे आयोजन केले होते. याच चर्चेवेळी ही धक्कादायक घटना घडली.

पंतप्रधान जरा लाज धरा

विरोधी बाकावर असलेल्या ‘अलायन्स फॉर द फ्यूचर ऑफ कोसोवो’च्या (AAK) खासदार टाईम काद्रियाज अचानक आपल्या आसनावरून उठल्या. त्यानंतर त्यांनी पुढे येत सभागृहाच्या पहिल्या रांगेत बसलेल्या काळजीवाहू पंतप्रधानांवर अनेक अंडे फेकले. तसेच ‘लाज धरा’ असे म्हणत त्यांनी पीएम कुर्ती यांना सुनावलं.

Video :

प्रक्षेपण थांबवण्याचा आदेश, व्हिडीओ व्हायरल

ही घटना घडल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लगेच धाव घेत कुर्ती यांना संरक्षण पुरवले. तसेच संसदेच्या अध्यक्षांनी टीव्ही आणि समाजमाध्यमांवर सुरू अललेले लाईव्ह प्रक्षेपण थांबवण्याचा आदेश दिला. तसेच ससंदचे कामकाज स्थगित केले. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या जगभरात व्हायरल झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us