लिबियासाठी पाकिस्तान ठरला साडेसाती, थेट लष्करप्रमुखासोबत तीन उच्च अधिकाऱ्यांचा मृत्यू, जग हादरलं..

लिबियाला अत्यंत मोठा धक्का बसला असून लिबियाच्या पंतप्रधानांनी एक निवेदन जारी करून कधीही न भरून निघणारे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. थेट लष्करप्रमुखांसह लष्कराशी संबंध तीन बड्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

लिबियासाठी पाकिस्तान ठरला साडेसाती, थेट लष्करप्रमुखासोबत तीन उच्च अधिकाऱ्यांचा मृत्यू, जग हादरलं..
Libyan Army Chief
| Updated on: Dec 24, 2025 | 7:26 AM

जगात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी लिबियामध्ये पाऊल ठेवताच त्या देशाला एक अत्यंत मोठा झटका बसला. लिबियासाठी पाकिस्तान साडेसाती ठरला आहे. पाकिस्तानसोबत संरक्षण करार केल्यानंतर लिबियावर मोठं संकट आले. थेट लिबियाचे लष्करप्रमुखांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यांच्यासह 7 जण अपघातात मरण पावले. पाकिस्तानचा मित्र देश तुर्कीतून लिबियाला येत असताना ही घटना घडली. लिबियाचे लष्करप्रमुख आणि इतर चार अधिकारी एका खाजगी विमानातून तुर्कीहून आपल्या देशात येत होते. मात्र, तुर्कीवरून उड्डाण भरल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांच्या विमानाची मोठा अपघात झाला. या विमान अपघाताबद्दल कळताच लबियाहून तपास करणारी टीम तुर्कीमध्ये पोहोचली. हा अपघात नेमका कसा झाला हे तुर्कीने सांगितले. मात्र, संशय अधिक वाढलाय.

तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथून लिबियाच्या लष्करप्रमुखांच्या विमानाने उड्डाण केली. लष्करप्रमुख, इतर चार अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे हे विमान अचानक कोसळले. या अपघातानंतर एकही व्यक्ती या विमानातील वाचू शकली नाही. सर्वांचा मृत्यू झाला. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. तुर्की आणि लिबिया यांच्यातील लष्करी सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने उच्च-स्तरीय संरक्षण चर्चेसाठी लिबियन शिष्टमंडळ अंकारा येथे आले होते.

तुर्कीसोबत झालेल्या चर्चेनंतर शिष्टमंडळ परत आपल्या देशात निघाले होते. लिबियाचे पंतप्रधान अब्दुल हमीद दबेबाह यांनी लष्करप्रमुख जनरल मुहम्मद अली अहमद अल हद्दाद आणि चार उच्च अधिकाऱ्यांच्या अपघाती निधनाबद्दल पुष्टी केली आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक निवेदनही जारी केले आहे. हा अत्यंत दु:ख अपघात आहे. लिबियाची टीम तुर्कीमध्ये पोहोचली असून संपूर्ण तपास केला जात आहे. हा खरोखरच अपघात की घातपात याचा शोध घेतला जातोय.

लिबियाच्या पंतप्रधानांनी म्हटले की, लिबियाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फाल्कन 50 प्रकारच्या बिझनेस जेटचा मलबा अंकारापासून 70 किलोमीटर दक्षिणेस हायमाना जिल्ह्यातील केसिक्कावाक गावाजवळ सापडला आहे. अपघातानंतर बोलताना तुर्कीच्या हवाई वाहतूक नियंत्रकांनी म्हटले, अंकाराच्या एसेनबोगा विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लिबियाला परतणाऱ्या त्या विमानाशी त्यांचा संपर्क तुटला होता. काहीतरी तांत्रिक समस्या त्या विमानात होती.